नागपूर -शुक्रवारी सकाळच्या सुमारास नागपूरच्या खरबी चौकात असलेल्या एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. भंगारच्या दुकानात ज्वलनशील वस्तू असल्याने बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केलं होतं. या घटनेत लाखो रुपयांचे नुकासन झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनदलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. खरबी परिसरातील ज्या भंगाराच्या दुकानाला आग लागली होती, ते दुकान वर्दळीच्या ठिकाणी आहे. आग पसरण्यापूर्वीच अटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.