नागपूर - नागपूर शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौकात (Medical Square) आज सकाळी चालत्या स्टार बसला अचानक आग (Running Bus fire) लागली होती. बसला आग लागल्याचे समजताच बस चालक आणि वाहकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Running Bus Fire : नागपुरातील मेडिकल चौकात धावत्या बसला आग; प्रवासी सुखरुप
नागपूर शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौकात (Medical Square) आज सकाळी चालत्या स्टार बसला अचानक आग (Running Bus fire) लागली होती. बसला आग लागल्याचे समजताच बस चालक आणि वाहकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
शॉर्टसर्किटमुळे बसला आग -शहर वाहतूक सेवेत असलेल्या स्टार बसला आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महिनाभरात दोन स्टार बस जळाल्या -सध्या नागपूरमध्ये तापमानाचा पारा हा 42 डिग्रीपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीसुद्धा एका स्टार बसला आग लागली होती. त्या घटनेतसुद्धा सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले होते. त्यानंतर आज पुन्हा स्टार बसला आग लागल्याची घटना घडली आहे.