नागपूर -अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ठोक आणि घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली ( Vegetable Price Hike ) आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील भाज्यांचा तोडाचं होऊ शकतं नसल्याने मोठ्या प्रमाणात भाज्या सडत असल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले ( Price Of Vegetable out Of Budget Common man ) आहेत. ठोक बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारे वांगीने घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. मेथी तर 120 ते 150 रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचली आहे. बहुतांश भाज्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याने ग्राहक देखील बाजारात फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ - राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.