नागपूर- नागपूरात विश्व मांगल्य संस्कार सभेच्यावतीने आगळा वेगळा विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पण हा विवाह लहान मुलांचा भातुकलीचा. सध्याच्या काळात लहान मुलांना लागलेले मोबाईलचे खेळण्यात गुंग असतात. त्यांना यापासून दूर करण्यासाठी विवाह संस्कार परंपरा आणि जुने खेळ यातून संस्कारीक बालक घडवण्याच्या ध्येय ठेवून त्यांच्यासाठी निरनिराळे हा उपक्रम राबवण्यात आला. यात हळद लग्न वऱ्हाडी, मंगलाष्टक आणि सगळ काही खऱ्या खुऱ्या लागणासारखे पण वधू आणि वर मात्र भातुकलीच्या खेळतील असा हा विवाह सोहळा जाणून घेऊ या विशेष वृतांतातून...
असा पडला विवाह सोहळा खास -लग्न म्हटल आणि वऱ्हाडी असली तर नाच गाणं झालं नाही असे होणार नाही. त्यामुळे या लग्नात मुलांसोबत वऱ्हाडी मंडळी आलेले त्यांची आई ताई आणि बच्चे कंपनीने धमाल मस्ती करत नाचले आणि आनंद लुटला. यानंतर सर्वांनी जेवणावर तावही मारला. असा हा विवाह सोहळा तेवढाच बच्चे कंपनीसाठी मजेदार आणि आनंद देऊन मोबाईल पासून दूर करत भातुकलीचा खेळात रमवणारा ठरला. भातुकलीचा विवाह सोहळयात सर्व परंपरा आणि प्रथा पूजन करण्यात आले. यात हळद, मेहंदी, व्याही भेट घेण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी वधू वर यांना सजवण्यात आले. हनुमान मंदिरात नवरदेव नेण्यात आला. त्यानंतर अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूने मुला आणि मुलींचे मामा उभे राहिले मंगलाष्टक म्हंटले फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी रुखवंतही सजवण्यात आले.