महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 1, 2021, 4:04 PM IST

Updated : Sep 1, 2021, 5:38 PM IST

ETV Bharat / city

सोशल मीडियावरून केलेली अनोळखी मैत्री नागपुरातील तरुणाला भोवली; फसवणूक करणाऱ्याला अटक

तन्वी रोज-रोज पैशाची मागणी करत असल्याने कंटाळलेल्या सुधांशुने याबाबत वडिलांना माहिती दिली. तक्रारदाराने सक्कारदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तन्वी उर्फ रौनक प्रभू वैद्य या आरोपीला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

अटक
अटक

नागपूर -इंस्टाग्रामवर तरुणींच्या नावावे आलेली मैत्रीची रिक्वेस्ट स्विकार करणे नागपुरातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्रामवर सुंदर तरुणीच्या फोटोचा डीपी लावून तन्वी नावाची मुलीने एका तरुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती. तन्वी रोजच्या रोजच पैशाची मागणी करत होती. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने याबाबत सक्कारदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तन्वीला अटक करण्यासाठी सापळा रचला. मात्र पोलिसांच्या हाती तन्वी ऐवजी रौनक नावाचा आरोपी लागला आहे. रौनक प्रभू वैद्य हा आरोपी तन्वीच्या नावावे इंस्टाग्रामवर तरुणांशी मैत्री करायचा आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

माहिती देतांना पोलीस

काय आहे प्रकरण?

रौनक नावाच्या आरोपीने तन्वी नावाने फेक अकाउंट तयार करून तक्रारदार तरुणासोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर त्याच्यासोबत व्हॉटसअँपच्या माध्यमातून जवळीक साधली. आरोपीने त्याचा विश्वास संपादित केल्यानंतर त्याच्याकडे न्यूड फोटोची मागणी केली. तरुणाने देखील मागचा-पुढचा कसलाही विचार न करता स्वतःचेच नग्न फोटो तथाकथित तन्वीला पाठवले. त्यानंतर सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. तन्वी रोज-रोज पैशाची मागणी करत असल्याने कंटाळलेल्या तरुणाने याबाबत वडिलांना माहिती दिली. तक्रारदारांनी सक्कारदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तन्वी उर्फ रौनक प्रभू वैद्य या आरोपीला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

रौनक प्रभू वैद्य या आरोपीने तन्वी नामक अकाउंट तयार करून काही तरुणांना मैत्रीची रिक्वेस्ट पाठवली. काहींनी ती स्वीकार केल्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल करणे सुरू केले. तरुणाने स्वतःचे नग्न फोटो तथाकथित तन्वीला पाठवले होते. ते फोटो वायरल करण्याची धमकी देऊन रौनकने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले आहेत. एकदाचे सेटलमेंट करण्यासाठी त्याने ५० हजारांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी रौनकला रंगेहाथ अटक केली आहे.

हेही वाचा -बीड : डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे गर्भवती महिलेशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

Last Updated : Sep 1, 2021, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details