महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दीक्षाभूमीत 30 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू; दीक्षाभूमी स्मारक समितीचा उपक्रम

दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने आर्थिक अडचणीत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना या सेंटरचा मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.

corna care center
कोरोना केअर सेंटर सुरू

By

Published : May 10, 2021, 6:26 AM IST

Updated : May 10, 2021, 6:46 AM IST

नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी दीक्षाभूमी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन भन्ते नागार्जुन सुरइ ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. या सेंटरमध्ये 15 ऑक्सिजन बेड आणि 15 विलगीकरण बेडची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

दीक्षाभूमी स्मारक समितीचा उपक्रम

आर्थिक अडचणींतील रुग्णांसाठी दिलासादायक-

नागपुरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचारासाठी आणि विलगीकरणासाठी असलेल्या सर्व कोविड सेंटरमध्ये देखील रुग्णांना जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने आर्थिक अडचणीत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना या सेंटरचा मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.

दीक्षाभूमीत 30 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू
कोरोनाबाधित रुग्णांसाठी सोय उपलब्ध करून देत या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सोय आणि प्राथमिक उपचारही केले जाणार आहेत. यात मात्र प्रकृती जास्त बिघडल्यास शासकीय किंवा खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठवण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. सेवाकार्य आणि गरजू रुग्णांना मदत करण्यासाठीच या कोविड केअर सेंटरचे उदिष्ट असल्याची माहिती फुलझेले यांनी दिली.
कोरोना केअर सेंटर
Last Updated : May 10, 2021, 6:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details