नागपूर - उपराजधानीसहजिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज मृत्यूच्या आकड्यात होणारी वाढ काळजाची धडकी भरवित आहे. रविवारी नव्याने 7 हजार 107 कोरोनाबाधितांची भर पडली. कोरोनाने आज 85 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 3 हजार 887 कोरोनातून मुक्त झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात रविवारी 26 हजार 792 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. शहरात 4 हजार 602 तर ग्रामीण भागात 2 हजार 498 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यात नागपूर शहरात 45 जणांचा मृत्यू तर ग्रामीण भागात 33 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बाहेर जिल्ह्यातील 7 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 6 हजार 273 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 243 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 3 हजार 887 कोरोनातून मुक्त झाले आहे.
पूर्व विदर्भात कोरोनाने 151 जण दगावले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही कोरोनाचे थैमान घातले आहे. 6 जिल्ह्यात रुग्णसंख्या 12 हजारांवर जाऊन पोहोचली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार