महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता निशुल्क लाकुड पुरवठा

कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मनपाच्या सर्व दहन घाटावर निशुल्क लाकुड उपलब्ध करून देण्याबाबत मनपाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे

मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता निशुल्क लाकुड पुरवठा
मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता निशुल्क लाकुड पुरवठा

By

Published : Apr 28, 2021, 1:29 PM IST

नागपूर - कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता निशुल्क लाकुड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यामार्फत सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत.

नागपुरात महानगर पालिकेच्या एकूण १६ दहन घाटांपैकी ६ दहन घाटांवर लाकडांकरिता शुल्क आकारले जात होते. याशिवाय लाकडाला पर्यायी ब्रिकेट्सद्वारे निशुल्क अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मनपाच्या सर्व दहन घाटावर निशुल्क लाकुड उपलब्ध करून देण्याबाबत मनपाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ज्या दहन घाटावर कोरोनाबाधित मृतदेहाचे अंत्यसंस्कार होतील तिथे नि:शुल्क लाकडे पुरविण्यात येतील.

या ठिकाणी मिळणार सेवा

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहनघाटांवर कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्काराकरिता पुढील आदेशापर्यंत निशुल्क लाकुड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व झोनस्तरावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी पत्र निर्गमित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details