नागपूर - नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणतीही खेळी करेल या भीतीने आज गुरुवार (दि. 13 ऑक्टोबर)रोजी काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. काँग्रेसला आपले सदस्य फुटण्याची भीती वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे.
Nagpur Congress: अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक! सदस्य फुटीच्या भीतीने काँग्रेसकडून सहलीचे आयोजन
नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणतीही खेळी करेल या भीतीने आज गुरुवार (दि. 13 ऑक्टोबर)रोजी काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. काँग्रेसला आपले सदस्य फुटण्याची भीती वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे - येत्या 17 ऑक्टोबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. सदस्य संख्या काँग्रेसच्या बाजूने आहे. तरी देखील कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून उपाय योजना सुरू केल्या आहेत. आज काँग्रेस माजी सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तमान अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वाखाल काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक पार पडली. त्यात आपले सदस्य फुटू नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेण्याच्या दृष्टीने सहलीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर जिल्हा परिषद संख्याबळ- नागपूर जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या ही 58 इतकी आहे. यामध्ये काँग्रेसकडे 30, राष्ट्रवादीकडे 10 तर भारतीय जनता पक्षाकडे 13 इतके सदस्य आहेत.