नागपूर- सत्तेत आपल्या विचारांची लोकं असून ते एका तंत्रात आहेत. त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामे योग्य असतीलच असे नाही. त्यामुळे सरकारच्या सर्वच कामाचे समर्थन करता येवू शकत नसल्याचे वक्तव्य संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे आयोजित लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकारच्या सर्वच कामांचे समर्थन करणे शक्य नाही - सरसंघचालक भागवत
सत्तेत आपल्या विचारांची लोकं असून ते एका तंत्रात आहेत. त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामे योग्य असेलच असे नाही. त्यामुळे सरकारच्या सर्वच कामाचे समर्थन करता येवू शकत नसल्याचे वक्तव्य संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
सरसंघचालक मोहन भागवत
सरकारी धोरणांमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो. हा हस्तक्षेप प्रभाव दाखवण्यासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी करत असतो. देशात आर्थिक स्वातंत्र्य असावे असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते. डॉ. हेडगेवार यांनी देखील देशाला आर्थिक जोखंडातून मुक्त करा असे १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटले असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले.