महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काहीही झाले तरी महाज्योती बंद पडू देणार नाही - मंत्री विजय वडेट्टीवार

काही झाले तरी महाज्योती बंद पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar comment on mahajyoti ) यांनी माध्यमांशी बोलताना मांडत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या आरोपांचे उत्तर दिले.

Vijay Wadettiwar comment on mahajyoti
महाज्योती विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया नागपूर

By

Published : Mar 2, 2022, 4:59 PM IST

नागपूर - काही झाले तरी महाज्योती बंद पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar comment on mahajyoti ) यांनी माध्यमांशी बोलताना मांडत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या आरोपांचे उत्तर दिले.

माहिती देताना मंत्री विजय वडेट्टीवार

हेही वाचा -"भारत सरकारला हात जोडून विनंती आहे, आमच्या लेकरांना मायदेशी परत आणा!" - पालकाची 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून मदतीची हाक

महाज्योती बंद करण्याचा हा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांचा आभारी आहे. मला महाज्योतीची वस्तुस्थिती मांडण्याची संधी दिली. या सगळ्या संदर्भात त्यांना लवकरच पत्र लिहून माहिती देईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची सुरवात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केली होती. कालांतराने स्कॉलरशिपमध्ये वाढ होऊन 2 हजार 200 कोटी रुपये दरवर्षी ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरुपात दिली जाते. ही सगळी काँग्रेसची पुण्याई आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. यात महाज्योतिला निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी आकडेवारी सांगत स्पष्टीकरण दिले आहे.

महाज्योती ओबीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करत आहे

पीएचडीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला असून, यात बर्टीसोबत महाज्योतिची तुलना करणे चुकीचे आहे. महाज्योतिकडून सातशे विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी 21 हजार दरमहा स्टायफंड दिला जात आहे. बार्टीच्या दोनशे विद्यार्थ्यांना 31 हजार स्कॉलरशिप दिली जाते, असेही स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले.

काहीही झाले तरी, महाज्योती बंद पडू देणार नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काही वेगळे असतील तर मला माहिती नाही. पीएचडीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे पैसे थकीत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. पण, काही विशिष्ट विचाराने प्रेरित दोन टक्के विद्यार्थी आरोप करत असल्याचेही ते म्हणाले. परवा औरंगाबादमध्येही तेच घडल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पन्नास वर्षांत जे काम झाले नाही ते काम महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत केले आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्याचे निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले असल्याचेही बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर अधिवेशनात प्रश्न मांडावे

अधिवेशन सुरू होत असून विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडावी. सरकारला विकासाबद्दल प्रश्न विचारावे. धोरणात्मक बाबींवर चर्चा केल्यास अधिक चांगले होईल, तरच जनतेचा फायदा होईल, अन्यथा गोंधळ घातला तर जनतेचे नुकसान होईल असे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली.

किरीट सोमैयांच्या तोंडाला झाकण नाही

किरीट सोमैया त्यांच्या तोंडाला आता झाकण राहिलेले नाही. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर वैयक्तिक आकसापोटी आरोप करत असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा -Russia Ukraine War Impact Maharashtra : पूर्व विदर्भातून युक्रेन-रशियात जाणारा 8 हजार टन तांदूळ थांबला

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details