महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक; नागपुरात कोरोनाचे नवीन 19 रुग्ण आढळल्याने खळबळ, एकूण संख्या 124 वर

नागपुरात यापूर्वी एकाच दिवशी 14 रुग्ण आढळले होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कोरोना रुग्ण आढळण्याचा नागपुरातील हा पहिलाच प्रसंग आहे.

By

Published : Apr 26, 2020, 11:19 AM IST

Updated : Apr 26, 2020, 8:55 PM IST

gnc
शासकीय रुग्णालय

नागपूर- शनिवारी उशिरा रात्री तब्बल 19 कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली. यात 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. हे सर्व बाधित सतरंजीपुरा व मोमीनपुरा भागातील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आहेत.

धक्कादायक; नागपुरात कोरोनाचे नवीन 19 रुग्ण आढळल्याने खळबळ, एकूण संख्या 124 वर

या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कोरोना रुग्ण आढळण्याचा नागपुरातील हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी एकाच दिवशी 14 रुग्ण आढळले होते. एकाच दिवशी 19 कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून या रुग्णांच्या संपर्कात कोण आले, याची माहिती घेणे सुरू आहे. सकाळी 1 व संध्याकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मध्यरात्री 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या नव्या 19 रुग्णांमुळे नागपुरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 124 वर पोहोचली आहे.

एकूण पॉझिटिव्ह नमुने - 124

मृत्यू - 01

रुग्णालयातून बरे होऊन सुट्टी - 22

रुग्णालयात उपचार सुरू - 101

Last Updated : Apr 26, 2020, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details