महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिला उमेदवार विजयी झाल्याचा आनंद; घोड्यावरून काढली मिरवणूक

जिल्ह्यात एका महिला उमेदवाराची गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नव-नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत.

मिरवणुकीतील दृश्य
मिरवणुकीतील दृश्य

By

Published : Jan 20, 2021, 5:00 PM IST

नागपूर-ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर गुलाल उधळून साजरा करण्यात येतो. मात्र, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत निवडणूक आलेल्या महिला उमेदवाराची ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. ही मिरवणूक उमरखेड तालुक्यामध्ये सावंगी खुर्दमध्ये काढण्यात आली आहे.

जिल्ह्यात एका महिला उमेदवाराची गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नव-नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामध्येदेखील असाच अनोखा आनंदोत्सव पार पडला. विजयी महिला उमेदवाराला चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. शीतल मनोहर सहारे असे मिरवणूक काढण्यात आलेल्या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे. महिला उमेदवाराने सावंगी खुर्द येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळविले. या यशाबद्दल गावकऱ्यांनी शीतलचे कौतुक करण्यासाठी चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. सावंगी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत शीतल सहारे अनुसूचित जमातीमधून विजयी झाल्या आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असतानादेखील शीतलने ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती.

महिला उमेदवार विजयी झाल्याचा आनंद

हेही वाचा-चर्चा तर होणारच! विजयी पतीला खांद्यावर बसवून पत्नीने काढली मिरवणूक

उच्चशिक्षित शीतल करणार गावाचा विकास

शीतल यांनी फिजिक्स या विषयात एमएसस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. शितल यांनी नागपुरातील इन्स्ट्यूिट ऑफ सायन्स येथून फिजिक्स या विषयात एमएस्सी पूर्ण केले आहे. उच्च शिक्षित तरुणी राजकारणात आल्याने गावाचा विकास होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. शिक्षणाचा फायदा लोककल्याणाकरिता करणार असल्याचे आश्वासन शीतल यांनी दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे शीतलने लोकांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढविली होती.

हेही वाचा-मतदानासाठी ना पैसै वाटले, ना केला घरोघरी प्रचार; चहा विक्रेत्याने 'अशी' जिंकली निवडणूक

पुण्यात पत्नीने पतीची काढली मिरवणूक

पुण्याच्या खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळू गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. संतोष यांच्या या विजयानंतर पत्नी रेणुका गुरव यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला.

ABOUT THE AUTHOR

...view details