नागपूर - नागपूर जिल्ह्यामध्ये ( Nagpur District ) सततधार पावसाने ( Rain ) सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे. 18 धरणातून ( dam ) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Appeal of district administration )केले आहे. मागील 2 दिवसात 10 जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनीही परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी आर. विमला यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला - मंगळवारी झालेल्या नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना ( villages ) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात पुढील 2 पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
3 प्रकल्प 100 टक्के भरले -नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 91.90 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 12 जुलै पर्यंत जवळपास 357 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 मध्यम धरणे 65 टक्के भरले आहे. यापैकी 3 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.