नागपूर - भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुन्हा एकदा विश्वचषकात पाकिस्तानला धूळ झाली आहे. या विजयाचा आनंद व्यक्त करण्याकरता नागपुरातील तरुणांनी धरमपेठ भागात जल्लोष केला.
नागपुरात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करताना 'मोदी-मोदी'च्या घोषणा
भारताने विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद नागपूरकरांनी फटाके वाजवून साजरा केला.
क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जातात. त्यामुळेच साऱ्यांचे लक्ष या सामन्याकडे होते. त्यातल्या त्यात सामना विश्वचषकात खेळला जात असल्याने त्याचे महत्त्व आणखीनच वाढले होते. याआधी झालेल्या अनेक विश्वचषकामध्ये भारताने पाकिस्तानला हरवलेले आहे. हा रेकॉर्ड भारतीय संघ कायम ठेवेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने भारतीय संघ देखील दडपणाखाली आला होता. मात्र, सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला नमवून आपला रेकॉर्ड अबाधित ठेवले आहे. त्यामुळेच या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता देशभरातील तरुणाई रस्त्यावर आली होती. पाकिस्तानला हरवणे म्हणजे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कमी नसलेल्या भावना नागपुरातील तरुणाईच्या होत्या. विजयाचा जल्लोष करताना नागपुरात मोदी-मोदी नारे देखील लावण्यात आले.
असा झाला सामना -
भारताने विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे मोठे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव झाला आहे.