महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक - नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हीटी दर ०.८४ टक्के

आरोग्य प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहरात काल (मंगळवारी) कोरोना बाधितांची संख्या अवघी ४६ एवढी असून ग्रामीण भागात ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने नागपूरचा पॉझिटिव्हीटी दर हा ०.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे.

नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हीटी दर ०.८४ टक्के
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हीटी दर ०.८४ टक्के

By

Published : Jun 9, 2021, 1:52 PM IST

नागपूर- कोरोना महामारीत होरपळून निघालेल्या नागपूर जिल्ह्याकरिता आनंदाची बातमी आहे. नागपूर शहरात कोरोना दहा महिन्याच्या निच्चांकी पातळीवर आल्याचे समोर आले आहेत. नागपूरचा पॉझिटिव्हीटी दर हा १ टक्क्यांपेक्षाही खाली नोंदवण्यात आला आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने नागपूरचा पॉझिटिव्हीटी दर हा ०.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पहिल्या लाटेपासूनच्या दहा महिन्यात नागपूर शहरात फक्त तीन वेळा शंभरपेक्षा कमी कोरोना बाधित आढळले होते. २५ जानेवारी २०२१ रोजी ९९ रुग्णांची नोंद झाली होती. तर त्याआधी १५ नोव्हेंबर २०२० ला ४८ रुग्ण आणि काल ८ जून २०२१ ला ४६ रुग्ण आढळल्याने नागपुरातील कोरोनावर नियंत्रण मिळाले असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

संक्रमणाचा दर १ टक्क्यांपेक्षा खाली

नागपूर शहरात गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासूनच्या दहा महिन्यात पहिल्यांदाच कोरोना बाधितांचा दैनिक आकडा ५० च्या खाली गेला आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना संक्रमणाचा दर १ टक्क्यांच्या खाली जाऊन ०.८४ टक्के एवढा कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आणि यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेचा सामना करणाऱ्या नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

नागपूरकरांना मोठा दिलासा

आरोग्य प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहरात काल (मंगळवारी) कोरोनाबाधितांची संख्या अवघी ४६ एवढी असून ग्रामीण भागात ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे नागपूर शहरात यापूर्वी शंभरपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळल्याचे फक्त दोन प्रसंग घडले आहेत. त्यामुळे आज आढळलेले ४६ कोरोनाबाधित म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेपासून नागपुरात कोरोनाचा निच्चांकी आकडा ठरला आहे. विशेष म्हणजे आज शहरात ५ हजार ४५५ जणांची कोरोना चाचणी होऊन, त्यापैकी फक्त ४६ जण कोरोनाबाधित निघाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट पहिल्यांदाच १ टक्क्यांच्या खाली जाऊन ०.८४ टक्के एवढा कमी झाला आहे. नागपुरात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८९ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. एॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या अनेक महिन्यानंतर तीन हजाराच्या खाली येऊन २ हजार ९२२ एवढी झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र गतीने उतरली

विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत नागपुरात रोज हजारो कोरोनाबाधित आढळत होते. काही दिवसांसाठी तर रोजचा कोरोनाबाधितांचा आकडा ५ ते ६ हजारांच्या घरात गेला होता. रोजची मृत्यू संख्या शंभरवर गेली होती. तर एॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ८० हजारांच्या घरात पोहोचल्याने नागपुरात हाहाकार मजला होता. लोक बेड, औषध, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण भटकत होते. मात्र, अवघ्या काही आठवड्यात चित्र बदलले असून नागपुरात कोरोनाचा आलेख कमालीचा घसरला आहे. कोरोनाची दुसरली लाट जेवढ्या गतीने वाढले त्यापेक्षा जास्त गतीने ओसरेल असा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज नागपुरात खरा ठरला आहे.

हेही वाचा -#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details