महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा ४

उपचारादरम्यान सोमवारी या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीला आधीपासून यकृत, क्षयरोग व इतर गंभीर आजार असल्याची माहिती आहे.

corona virus in nagpur
corona virus in nagpur

By

Published : May 12, 2020, 10:44 AM IST

नागपूर - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मृत्यूचा आकडासुद्धा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. नागपुरात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, यामुळे नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या आता 4 झाली आहे.

मृत 39 वर्षीय पुरुष हा नागपूरच्या पांढराबोडी परिसरातील राहणारा आहे. 6 मे ला आजारपणामुळे त्याला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची कोरोना तपासणी केल्यावर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान सोमवारी या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीला आधीपासून यकृत, क्षयरोग व इतर गंभीर आजार असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details