नागपूर - निवडणुकीच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी दिल्या आहेत. यावेळी निवडणुकीत घवघवीत यश मिळू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.
हेही वाचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'लता 90' या पुस्तकाचे प्रकाशन
मंगळवारी रात्री शहरात पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ, रेणुका मंदिर संस्थान यांसह काही सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देऊन देवीचा आशीर्वाद घेतला.
हिंगणा रस्त्यावरील रेणुका मंदिर देवस्थानला शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यानुसार याठिकाणी सध्या विकासकार्य सुरू असून कामाची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली.