नागपूर -केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक विधेयक मंजूर केली आहेत. त्याला विरोध म्हणून आज नागपूर येथे भीम आर्मीच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वतःला बेड्यात अडकवून शहरातील विविध भागात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी भ्रमंती केली. शिवाय केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात भीम आर्मीचे आंदोलन; बेड्या घालून केली शहरात भ्रमंती
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकांच्या विरोधात भीम आर्मीकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भीम आर्मीचे कार्यकर्ते बादल बागडे यांनी स्वतःला बेड्याने घालून घेतल्या. यावेळी भीम आर्मीचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी काळासाठी केंद्र सरकार विविध धोरणं आखत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा कुठलाही विचार न करता नवनवीन विधेयके मंजूर करण्यात येत आहेत. या विधेयकांचा विरोध करत भीम आर्मीकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भीम आर्मीचे कार्यकर्ते बादल बागडे यांनी स्वतःला बेड्या घालून सहभागी झाले होते. यावेळी भीम आर्मीचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. जनसामान्यांची मते लक्षात न घेता केंद्र सरकार निर्णय थोपवत आहे. याचाच निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी म्हटले.
या आंदोलनादरम्यान मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सोबत केंद्र सरकारकडून घेतले जाणारे निर्णय हे एखाद्या बेड्यांसारखे आहेत. ज्यात सर्वसामान्य अडकत चालले आहे. याचीच जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी हे आंदोलन पुकारल्याचे शेंडे यांनी सांगितले. या आंदोलनाची सुरूवात शहरातील राम नगर परिसरातून करण्यात आली.