महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकची पुनरावृत्ती टळली; नॉयलॉन मांजाने १७ वर्षीय मुलाचा कापला गळा

आदित्यचा गळा कापला गेला. रक्त बंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. त्याच्यावर एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने नागपुरमध्ये नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुर असल्याचे उघड झाले आहे.

नायलॉन मांजाने मुलगा जखमी
nylon cat in Nagpur

By

Published : Dec 31, 2020, 9:27 AM IST

Updated : Dec 31, 2020, 9:34 AM IST

नागपूर- नाशिकमध्ये नायलॉन मांज्यामुळे एका महिलेचा जीव गेल्यानंतर आता नागपूरमध्ये सुद्धा अशीच गंभीर घटना घडली आहे. नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं एका मुलाचा गळा कापला गेल्याची घटना घडली आहे. मांजाने गळा कापला गेलेला १७ वर्षीय आदित्य भारद्वाज गंभीर जखमी आहे.

नायलॉन मांज्यामुळे जखमी झालेला आदित्य मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकने कॉम्प्युटर क्लासला जात होता. त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉयलॉन मांजा आडवा आला. त्यामुळे आदित्यचा गळा कापला गेला. रक्त बंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचाराकरीता जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आदित्यची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच आदित्यच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झालंय, त्यात आदित्यचा नॉयलॉन मांजामुळं झालेल्या अपघातामुळं त्याची आई आणि लहान भावासमोर मोठं संकट निर्माण झालाय. या घटनेमुळं बंदी असलेला नॉयलॉन मांजाचा वापर अजूनही काही पतंगबाज करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी नागपुरात नॉयलॉन मांजानं अनेकांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एक पोलीस कर्मचारी सुद्धा नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले होते

मनपा आणि पोलिस विभागाने सुरू केली कारवाई
नायलॉन मांज्याच्या विरोधात नागपूर महानगर पालिका आणि पोलीस विभागाने कारवाई सुरू केली आहे, मात्र ही करवाई म्हणजे मी मारल्या सारखं करतो आणि तू राडल्या सारखं कर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटू लागली आहे. नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details