महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Signals Off in Nagpur : नागपुरात वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी 21 सिग्नल असणार बंद; वाहतुक पोलिसांचा निर्णय

उन्हाचे चटके ( Rising heat in nagpur ) सहन करावे लागत आहे. यासाठीच नागपूर पोलिसांनी ( Traffic police Nagpur ) एक महत्त्वाचा निर्णय घेत नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील 21 चौकातील सिग्नल ( 21 signal off Nagpur ) दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड ( Deputy Commissioner of Police Sarang Awhad ) यांनी घेतले आहे.

सिग्नल नागपूर
सिग्नल नागपूर

By

Published : May 5, 2022, 7:44 PM IST

Updated : May 5, 2022, 7:59 PM IST

नागपूर -नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सिग्नलवर थांबून उन्हाचे चटके ( Rising heat in nagpur ) सहन करावे लागत आहे. यासाठीच नागपूर पोलिसांनी ( Traffic police Nagpur ) एक महत्त्वाचा निर्णय घेत नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील 21 चौकातील सिग्नल ( 21 signal off Nagpur ) दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड ( Deputy Commissioner of Police Sarang Awhad ) यांनी घेतले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी


सध्या उन्हाचा पारा सरासरी 45 अंशावर जाऊन पोहचला असून सूर्यनारायन जणू आग ओकत असल्याचे चटके सहन करावे लागते आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी ज्या याठिकाणी फारशी गर्दी नसते आणि सिग्नल बंद असले तरी वाहतुक कोंडी होणार नाही, असे 21 सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, लेडीज क्लब चौक, बजाजनगर चौक आदींचा समावेश आहे.


गर्दी होत नसल्याने चौकातील सिग्नल असणार बंद : बंद करण्यात आलेल्या सिग्नलवर दुपारच्या वेळी फारशी गर्दी नसते. त्यामुळे उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागणार नाही. सध्य स्थितीत तापमानाचा पारा 45 अंशाच्या घरात जाऊन पोहोचला आहे. अशातच या सिग्नलवर फारशी गर्दी होत नाही. किंबहुना रस्ते हे रिकामे असतात. त्यामुळे यात वाहतूक कोंडी किंवा वाहतूक प्रभावीत होणार नाही, असे 21 सिग्नलचे अवलोकन करून हे सिग्नल बंद ठेवण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर असलेले सिग्नल बंद केले असून उन्हाचा प्रकोप कमी झाल्यानंतर पुन्हा सिग्नल पूर्ववत केले जाणार आहे.


नागपुराकरांकडून निर्णयाचे स्वागत :नागपुरात उन्हाचा पारा पाहता नागरिकांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. यात वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे नागपूरकरांकडून स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये काचीपुरा, बजाज नगर, लक्ष्मी नगर, माता कचेरी, कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, सरदार पटेल चौक, वैद्यनाथ चौक, मनपा झोन 4 ऑफिस, नरेंद्रनगर, कडबी चौक, 10 नंबर पुलिया, भीम चौक, जपानी गार्डन, पोलीस तलाव, राठोड लॉन चौकवरील सिग्नल बंद असणार आहे.

हेही वाचा -Mumbai Police Save Girl Life : मुंबई पोलिसांतील सिंघम; स्वत: वार झेलत वाचवला तरुणीचा जीव

Last Updated : May 5, 2022, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details