महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बँक खात्यात तात्काळ दहा हजारांची मदत देणार - मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यात पूरग्रस्त परिस्थिती आणि भूस्खलनामुळे आलेल्या आपत्तीमधील पीडित कुटुंबाना तात्काळ 10 हजारांची मदत आणि अन्न धान्य वाटपाला उद्यापासून सुरवात होणार, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

By

Published : Jul 29, 2021, 10:42 PM IST

Immediately ten thousand help Vadettiwar
तात्काळ दहा हजार मदत वडेट्टीवार

नागपूर - राज्यात पूरग्रस्त परिस्थिती आणि भूस्खलनामुळे आलेल्या आपत्तीमधील पीडित कुटुंबाना तात्काळ 10 हजारांची मदत आणि अन्न धान्य वाटपाला उद्यापासून सुरवात होणार, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यावर आलेल्या आपत्तीने प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे केंद्रीय पथकाने तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

माहिती देताना मंत्री विजय वडेट्टीवार

हेही वाचा -चिंताजनक : रुग्णाच्या आतड्यात काळ्या बुरशीचा संसर्ग; मेंदू-डोळे-जबड्यासह अन्य अवयवांनाही म्युकर मायकोसीसचा धोका

या महापुरामुळे राज्यभरात 169 लोकांचा मृत्यू झाला असून 55 लोक जखमी झाले आहेत. सर्वांची ओळख पटली असून एक जण बेपत्ता आहे, असेही ते म्हणालेत. केवळ कोकणालाच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर यासोबत मराठवाड्यात नांदेडसह अन्य भागांना पुराचा फटका बसला आहे. जवळपास 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले असून, हे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

या महापुरात रस्त्याचे जवळपास 1 हजार 800 कोटीचे नुकसान झाले आहे. तेच वीज वितरण व्यवस्थेचे 400 कोटींच्या घरात नुकसान झाले आहे. या महापुरामुळे अनेक शहरात आणि गावांमध्ये अजूनही चिखल साचलेला आहे, नुकसानीचे पंचनामे झाले नाही. सर्व पंचनामे करायला किमान आठ दिवस जातील. यासोबत चिपळूण, महाळ, सांगली, सातारा या भागात सर्वात जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तात्काळ मदत म्हणून उद्यापासून 10 हजार रुपये बँक खात्यात द्यायला सुरुवात होईल. हे पैसे रोख दिल्यास गोंधळ, भष्ट्राचार असे अन्य प्रकार टाळण्यासाठी ही मदत बँक खात्यात दिली जाईल. यासोबत प्रत्येकी पाच किलो गहू, तांदूळ, 5 लिटर केरोसीन वाटप केले जाणार आहे. यासोबत राशन कार्ड, आधारकार्डसारखे सर्व रेकॉर्ड महापुरात खराब झाल्याने फोटो काढून त्यालाच नुकसान भरपाई देण्यासाठी ग्राह्य धरले जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

केंद्राचे मानले आभार?

केंद्राने जाहीर केलेली 700 कोटींची मदत ही मागील वर्षात ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीची आहे. ही मदत दिली त्यासाठी आभार आहे, असे म्हणत 3 हजार 721 कोटींची मदत मागितली असताना केवळ 700 कोटी दिले, असे वडेट्टीवार म्हणाले. यासोबत केंद्रीय पथकाने भागाची पाहणी करून लवकरात लवकर अहवाल द्यावा, आणि मदत जाहीर करावी. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांनी ज्या पद्धतीने नुकसान होताच गुजरातचा दौरा केला, त्याच पद्धतीने महाराष्ट्र्राचाही दौरा करावा आणि जशी विना पंचनामे करत मदत जाहीर केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रालासुद्धा मदत द्यावी, असेही वडेट्टीवार म्हणालेत.

अल्प दारात कर्ज देण्यासाठी चर्चा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात व्यापारी वर्गाचे नुकसान झाले. ते उद्योग व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी जिल्ह्यांतील बँकांनी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देत मदत करावी. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बँकांची परिस्थिती भक्कम आहे. यामुळे व्यापारी वर्गाला दोन ते तीन टक्के अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांनी निर्णय घ्यावा, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणालेत.

निर्बंध शिथिल करण्याचे संकेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात विचारपूर्वक निर्णय केला जाईल. यात मुख्यमंत्री टास्कफोर्सच्या बैठकीत चर्चा करणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण कमी आहे. तेच काही जिल्ह्यांत अजूनही परिस्थिती खराब आहे. एकदा निर्बंध खुले केल्यास कोरोना पुन्हा वाढण्याची भीती आहे. यामुळे काळजीपूर्वक टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्याचा नक्कीच विचार होणार आहे. याबद्दल आज मुख्यमंत्री घोषणा करतील, असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच, मुंबई लोकलबाबत निर्णय होईल, असेही म्हणालेत.

संसदेच्या अधिवेशनात गाजत असलेला हेरगिरीचा मुद्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, फोन टॅपिंग करणे हा गुन्हाच आहे. ते केव्हा करतात सर्वांना माहीत आहे. या संदर्भात जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई नियमानुसार, कायद्यानुसासर करावी लागेल. हा प्रकार व्हायला नको, अधिकारांच्या पलीकडे जाऊन असे प्रकार कोणता अधिकारी करत असेल तर ते चुकीचे आहे. न्यायालय आदेश देईल त्या संदर्भात कारवाई होईल.

भविष्यातील घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांचे मत जाणून घेऊ

यावेळी जे महापूर, ढगफुटीने घडले ते भयानक आहे. अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागले. गाडगीळ समिती आहे. कोकणासाठी गाळगीळ समिती नेमली होती, कारण कोकण हा इको सेन्सेटिव्ह झोन आहे. यामुळे उपाययोजना करताना तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. भविष्यात या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी झालेला तज्ज्ञांचे अभ्यास, अहवाल याचाही विचार करण्यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा -नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details