मुंबई - 'इथे दारू का पिता' अशी विचारणा केल्याने झालेल्या वादातून एका तरूणार तलवारीने वार केल्याची घटना घडली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी अक्षय रेवालेसहीत त्याच्या मित्रांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.
दारूच्या पिण्याच्या वादातून एकावर तलवारीने वार, तरुणाचा मृत्यू
'इथे दारू का पिता' अशी विचारणा केल्याने झालेल्या वादातून एका तरूणार तलवारीने वार केल्याची घटना घडली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
जितू गागडा असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. जितू हा विद्याविहार येथील बंजारा वस्तीत राहत होता. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत जितू गागडा आणी त्याचा मित्र रॉकी पारचा हे एका ठिकाणी दारू पित बसले होते. दरम्यान, अक्षय रेवाले टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या बंजारा वस्ती येथून जात होता. तेव्हा अक्षयने जितू आणि त्याच्या मित्राला 'इथे दारू का पिता' अशी विचारणा करताच दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादाचा रूपांतर हाणामारीत झालं. तेव्हा रॉकी पारचा या जीतूच्या मित्राने अक्षय रेवाले याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली, तेव्हा आरोपी अक्षयने रागात त्याच्या इतर साथीदारांना घडलेला प्रसंग सांगत घटनास्थळी बोलवले. त्यानंतर अक्षय व त्याचे मित्र अनिकेत घायतीडके, आतिश घायतीडके, संतोष सरदार यांनी तलवार व चाकूने हाणामारी करत थेट जितूच्या डोक्यात, पाठीत आणि दोन्ही पायावर वार केल्याने जितू गागडा याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी आरोपी अक्षय रेवाले याला अटक केली असून, अन्य साथीदारांचाही पोलिसांनी शोध घेवून रात्री उशिरा त्यांना बेड्या ठोकल्या असल्याची माहीती टिळकनगर पोलिसांनी दिली.