महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Woman Attempts Suicide: प्रियकराने आत्महत्या केली म्हणून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकराने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याने नैराश्यात ग्रासलेल्या तरुणीने वाशी पुलावरून आत्महत्येच्या प्रयत्न केला. (Young Woman Attempts Suicide in Mumbai) या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आले असून या या मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे. तिच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

vashi bridge
वाशी पूल

By

Published : Jan 5, 2022, 7:17 AM IST

Updated : Jan 5, 2022, 3:17 PM IST

मुंबई -प्रियकराने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याने नैराश्यात ग्रासलेल्या तरुणीने वाशी पुलावरून आत्महत्येच्या प्रयत्न केला. (Young Woman Attempts Suicide On Washim Bridge) या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आले. या या मुलीला (Young Woman Attempts Suicide in Mumbai) आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून तिच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन दिवसांपूर्वी मुलीला प्रेमासाठी विचारलेल्या मुलाने गळफास लावून केली आत्महत्या

संबंधित मुलगीही चेंबूर येथील रहिवासी आहे. तिच्याकडे प्रेमाचा प्रस्ताव ठेवणारा मित्रही चेंबूर येथील रहिवासी आहे. मुलीला प्रेमासाठी तिचा मित्र वारंवार विचारणा करीत होता. मात्र, या मुलीने त्याला नकार दिला (Young Woman Attempts Suicide On Washim Bridge) त्यामुळे चिडलेल्या त्या मुलाने मद्यप्राशन करून तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेनंतर ही मुलगी प्रचंड तणावात आली.

मित्राने आत्महत्या केल्याने बसला मुलीला धक्का

संबंधित अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी विचारणा करणाऱ्या मित्राने आत्महत्या केल्याचे पाहून ही मुलगी तणावात आली. त्या तणावात या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. घरात कोणालाही न सांगता ती चेंबूरहून वाशी पुलावर आली व पुलावरून तिने उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला.

मुलीला वाचवण्यासाठी पोलीस व मच्छीमार बांधवांचे शर्तीचे प्रयत्न

एका मुलीने वाशी पुलावरून उडी मारल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार तत्काळ तिथे पोहोचून स्थानिक मच्छीमार महेश सुतार, पोलीस हवालदार नाईकवडी, वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई दराडे, घुले, वीरकर यांनी बोटीच्या साहाय्याने या मुलीला तत्काळ बाहेर काढले. पाण्यात उडी मारल्याने मुलीचे नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तिच्या छातीत दुखू लागले त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले व तिच्या आई-वडिलांशी संपर्क करून तिला त्यांच्या तब्यात दिले. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -Maharashtra Corona Case : राज्यात 18 हजार 466 नवे कोरोनाग्रस्त, 20 मृत्यू

Last Updated : Jan 5, 2022, 3:17 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details