महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Wrestler Postman Mumbai : मुंबईचे पैलवान पोस्टमन निघाले हरियाणाला; राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

भारतीय पोस्ट विभागासाठी मुंबईत सेवा देणारे राष्ट्रीय स्तरावरचे कुस्तीपटू स्वप्निल वरुडकर (Postman Wrestler Swapnil Varudkar) यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी (Haryana National Wrestling Tournament) दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पैलवान वरुडकर हे स्थानिक विदर्भातील दर्यापूर इथल्या हनुमान व्यायाम क्रीडा मंडळात (Hanuman Exercise Sports Board Daryapur) वयाच्या 15 व्या वर्षांपासून तालमीत जात आहेत. (Swapnil Varudkar for National Wrestling Tournament)

मुंबईचे पैलवान पोस्टमन स्वप्निल वरुडकर प्रमाणपत्र दाखविताना
मुंबईचे पैलवान पोस्टमन स्वप्निल वरुडकर प्रमाणपत्र दाखविताना

By

Published : Sep 26, 2022, 5:51 PM IST

Updated : Sep 26, 2022, 10:59 PM IST

मुंबई : भारतीय पोस्ट विभागासाठी मुंबईत सेवा देणारे राष्ट्रीय स्तरावरचे कुस्तीपटू स्वप्निल वरुडकर (Postman Wrestler Swapnil Varudkar) यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी (Haryana National Wrestling Tournament) दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पैलवान वरुडकर हे स्थानिक विदर्भातील दर्यापूर इथल्या हनुमान व्यायाम क्रीडा मंडळात (Hanuman Exercise Sports Board Daryapur) वयाच्या 15 व्या वर्षांपासून तालमीत जात आहेत. (Swapnil Varudkar for National Wrestling Tournament)


सलग दुसऱ्या वेळी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड -कुस्तीपटु स्वप्नील वरूडकर यांनी भारतीय पोस्ट महाराष्ट्र सर्कल हिंदकेसरी अमोड बुचडे अकॅडमी पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेत्यामुळे आता त्यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. मागील वर्षी सुद्धा स्वप्नील वरुडकर यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये कास्य पदक प्राप्त करून आपला ठसा उमटवला होता. स्वप्नील वरुडकर हे अनेक मोठ मोठ्या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून सुद्धा कार्यरत असतात.

मुंबईचे पैलवान पोस्टमन निघाले हरियाणाला


15 व्या वर्षांपासून कुस्ती -आपल्या प्रवासाबाबत ईटीवी भारतशी बोलताना वरुडकर सांगतात की, "2021 मध्ये मी भारतीय डाक विभागात भरती झालो. त्याआधी मी गावाकडे अनेक वेगवेगळी काम केली. आमच्या गावात व्यायाम शाळा असल्याने अनेक पैलवान आहेत. हा व्यायामाचा वारसा मला माझ्या घरातूनच मिळाला. वयाच्या पंधराव्या वर्षापासून माझ्या घरच्यांनी मला तालमीत पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी तालमीत कुस्ती शिकतोय. यात मी अनेक स्थानिक पातळीवरच्या स्पर्धा जिंकल्या आहेत."


मॅटवरच्या कुस्तीला सुरुवात -पुढे बोलताना स्वप्नील सांगतात की, "गावाकडची तालमीतली कुस्ती ही मातीत होते. मी देखील याच मातीत खेळणारा मल्ल होतो. मात्र, आमच्या गावातील अनेक तरुण पैलवान तसेच महिला पैलवान देखील विविध ठिकाणी स्पर्धेला जायला लागल्याने आमच्या तालमीच्या व्यवस्थापकांनी मॅटवरच्या कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. या मॅटवरच्या कुस्तीच्या प्रशिक्षणामुळे पुढे मी राज्यस्तरीय पातळीवर माझा खेळ दाखवण्यास सुरुवात केली. मला मॅटवरच्या कुस्तीवर मिळणारे यश आणि माझा खेळ पाहून मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी माझी निवड करण्यात आली. आणि आता दुसऱ्यांदा हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी माझी निवड करण्यात आलेय."


खुराक कसा असतो?
पैलवान म्हटलं की सगळ्यांना आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे त्याच्या खुराकाचा. कारण, आतापर्यंत आपण एखाद्या पैलवानाच्या खुराकाच्या अनेक कथा ऐकत आलेलो असतो. याच खुराकाविषयी आम्ही स्वप्निल यांना विचारलं असता ते सांगतात, "मी पूर्णपणे शाकाहारी आहे. फक्त मांसाहार केल्यानेच तुमची बॉडी बनते अथवा तुम्ही तुमचं शरीर मजबूत होतं अशा ज्या काही कल्पना आहेत त्या सर्व भ्रामक आहेत. मी आतापर्यंत कधीही मांसार केलेला नाही. घरीच गाई म्हशी असल्याने दूध दुभत्याची काही कमी नव्हती. रोज सकाळी उठून दूध पिणं थंडाई आणि सोबतच ताज्या पालेभाज्या खाणं हाच माझा खुरात असतो."


नोकरीमुळे विदर्भ सोडून मुंबईत -स्वप्निल हे 2021 साली भारतीय पोस्ट विभागात भरती झाले. त्यानंतर ते नोकरीनिमित्त मुंबईत आले. आता मुंबईत आल्यावर कुस्तीची प्रॅक्टिस कशी करणार? असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. याबाबत स्वप्नील सांगतात, "मी आमच्या भारतीय डाक विभागासाठी खेळतो. त्यामुळे मला काही वेळ सरावासाठी देखील डिपार्टमेंट कडून दिला जातो. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी मी माझा वेळ इतरत्र वाया न घालवता माझ्या रेसलिंगच्या सरावासाठी देतो. मुंबईत रेसलिंगची मैदानी आहेत तिथे मी जातो आणि माझा सराव करतो.

Last Updated : Sep 26, 2022, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details