मुंबई - राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे. या आधीही पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे आता महिला पोलिसांच्या कामाच्या तासाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच त्याचा महिला पोलिसांना लाभ होईल, अशी प्रतिक्रिया माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन
- महिला पोलिसांच्या कामाचे तास केले कमी -
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दलाकडून केले जाते. पोलिसांना मंत्र्यांच्या सुरक्षेपासून गल्लीतील भांडणही मिटवावी लागतात. १२ ते २४ तास बंदोबस्ताचे काम करावे लागते. व्हीआयपी तसेच राज्यात घातपात होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून राज्याची सुरक्षा करावी लागते. याच पोलीस दलात महिला पोलिसही काम करतात. पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना बारा तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना त्याच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी लागत आहे. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेकवेळा या महिला पोलिसांना १२ तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर आणि कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- राज्याने जीआर काढावा -