महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्रामीण भागातील महिलांनी गाजवला फॅशन शो

मुंबईच्या बीकेसीमध्ये ग्रामीण महिला उद्योजकांनी सहभाग घेतला. या फॅशन शोला उपस्थितांची मोठी दाद मिळाली.

By

Published : Jan 29, 2020, 5:32 PM IST

Updated : Jan 29, 2020, 6:48 PM IST

women-from-rural-areas-participated-in-fashion-show
ग्रामीण भागातील महिलांनी गाजवला फॅशन शो

मुंबई -फॅशन शो म्हटला की रॅम्पवर कॅटवॉक करणाऱ्या मॉडेल्स त्यांचे चालणे, त्यांची देहबोली हेच डोळ्यासमोर येते. या पेक्षा निराळा फॅशन मुंबईतील बीकेसी येथे पार पडला. ज्यात ग्रामीण महिला उद्योजकांनी सहभाग घेतला. या फॅशन शोला उपस्थितांची मोठी दाद मिळाली.

ग्रामीण भागातील महिलांनी गाजवला फॅशन शो

कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर देशभरातील बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या महिला स्वतः कपडे शिवून तयार करतात. मात्र, ते घालायची संधी त्यांना कधी मिळत नाही, यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात त्यांच्यासाठी विशेष फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध बचतगटाच्या महिलांनी यात भाग घेतला होता. 75 वर्षीय आजीने केलेला कॅट वॉक हा या शो मध्ये लक्षणीय ठरला. फॅशन शोच्या माध्यमातून विविध राज्यातील पारंपरिक पोशाखात महिलांनी रॅम्प वॉक केला.

ग्रामीण महिलांना पुढे आणण्याचे काम उमेद अभियान करत आहे. कुर्ला बांद्रा संकुल येथे भरलेल्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. या प्रदर्शनात अंदाजे 15 कोटींची उलाढाल झाली आहे. पुढच्या वर्षी आकडा अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण उद्योजक महिला बचतगटांना आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. असे उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

Last Updated : Jan 29, 2020, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details