महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझेंची पाठराखण संजय राऊत का करतायेत? - राम कदम

आजच्या सामनामधून पुन्हा एकदा सचिन वाझेंची पाठराखण केली आहे. मुंबई आयुक्तांची बदली हे रूटीन बदली असल्याचे म्हटलंेआहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत वादामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे राम कदम यांनी सांगितले.

Ram Kadam
राम कदम

By

Published : Mar 19, 2021, 6:34 PM IST

Updated : Mar 19, 2021, 6:46 PM IST

मुंबई - पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणातील आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर 'सामना'च्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. बदल्यांमागील कारणे सांगताना सामनातून भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी 'सामना'च्या अग्रलेखावर टीका केली आहे. सचिन वाझे यांची पाठराखण संजय राऊत का करत आहेत? असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते राम कदम

हेही वाचा -या 5 कारमध्ये दडलीये अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यूची चावी

राम कदम म्हणाले की, आजच्या सामनामधून पुन्हा एकदा सचिन वाझेंची पाठराखण केली आहे. मुंबई आयुक्तांची बदली हे रूटीन बदली असल्याचे म्हटलंेआहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत वादामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे कदम यांनी सांगितले.

काय आहे 'सामना' अग्रलेखात

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. टीआरपी घोटाळय़ाची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता. तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल, असे 'सामना'च्या अग्रलेखात नमूद केले आहे.

हेही वाचा -पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा

दहशतवादासंदर्भातील प्रकरणाचा तपास 'एनआयए' करत असते, पण या जिलेटिनच्या कांडय़ांचा तपास करणाऱया 'एनआयए'ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा 'एनआयए'साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडींचे श्रेय राज्यातील विरोधी पक्ष घेत आहे. अटकेत असलेले फौजदार वाझे यांच्यामागचे खरे सूत्रधार कोण? वगैरे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला व त्याबद्दल सगळय़ांनाच दुःख आहे. भाजपला जरा जास्तच दुःख झाले आहे, पण याच पक्षाचे एक खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संसदेचे अधिवेशन सुरू असताना दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. शर्मा हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपवाले छाती बडवताना दिसत नाहीत. मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत तर कोणी 'ब्र' काढायला तयार नाही. सुशांतसिंह राजपूत व त्याच्या कुटुंबीयांना तर सगळेच विसरून गेले आहेत. एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल कसे करायचे हे सध्याच्या विरोधी पक्षाकडूनच शिकायला हवे. मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न या काळात सुरू आहेत. विरोधी पक्षाने निदान एवढे पाप तरी करू नये. विरोधी पक्षाने महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण हे असे उपद्व्याप केल्याने त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्च्या मिळतील हा भ्रम आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

Last Updated : Mar 19, 2021, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details