मुंबई -रत्नागिरीतील खेड तालुक्यातील ( Khed Taluka in Ratnagiri )लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Primary Health Centre ) कार्यरत असलेल्या डॉ.रमेश सोनावणे यांचे निधन नंतर त्या ठिकाणी त्यांची पत्नी कविता सोनवणे यांनी अर्ज केला होता मात्र केवळ वय 45 वर्षे पूर्ण झाले असल्याने त्यांना वगळण्यात आल्याने त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती यांनी राज्य सरकारला विचारले की अनुकंपा तत्वावर नोकरी ( Compassionate employment ) देण्यास राज्य सरकार ( State government ) सवंदनशील आहे. तर वयाची अट का असा प्रश्न विचारात यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल -अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी देण्यास राज्य सरकार जर संवेदनशील आहे. तर वयाची अट का? घातली जाते. अशा कुटुंबाला एकरकमी निधी का दिला जात नाही ? जेणेकरून त्यांचे जीवन सुखकर होईल अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले आणि अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महाधिवक्त्यांना भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली होती.
नोकरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता -रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ.रमेश सोनावणे एमबीबीएस यांचे मार्च 2021 मध्ये निधन झाले. निधनानंतर त्यांच्या पत्नी कविता यांनी अनुकंपात्वावर नोकरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला. त्यानुसार सोनावणे यांच्या नावाची प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आली. मात्र सरकारच्या नियमानुसार वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव प्रतिक्षा यादीतून काढण्यात येते. त्यामुळे राज्य सरकारला नोकरी देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका कविता सोनावणे यांच्यावतीने अॅड. नितेश भुतेकर आणि अॅड. सचिन चंदन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.