मुंबई - कार्डिलिया क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ खान (Kashif Khan) याच्या विरोधात पुरावे असूनही त्याला अटक केली जात नाही. काशीफ खान आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे काय संबंध आहेत? असा सवाल पुन्हा एकदा राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केले आहेत. WhatsApp चॅट्स हाती लागले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
'काशीद खान याला का पकडण्यात आले नाही?'
ड्रग्स प्रकरणांमध्ये नव्याने काही खुलासा करण्यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज ट्विट केले होते. त्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले असून एनसीबी ने केलेल्या कारवाईवर त्यांनी बोट ठेवले आहे. आपल्याला के. पी. गोसावी आणि दिल्लीतील एक खबरी यांच्यातील WhatsApp चॅट्स हाती लागले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या चॅटमध्ये व्हाईट दुबे (White Dube) नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. दिल्लीच्या खबरीने के. पी. गोसावी कडून का शिक्षकांचा फोटो मागवला. मग इतर आरोपींना फोटो बघून ज्या प्रकारे पकडण्यात आले त्या प्रकारे काशीद खान याला का पकडण्यात आले नाही? एनसीबीने पार्टीमध्ये एवढी मोठी कारवाई करूनही आयोजकाला का ताब्यात घेतले नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.