मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीवर निशाणा साधत अनेक खळबळजनक आरोप करत आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक आरोप केला आहे. एनसीबीच्या तीन केसमध्ये फ्लेचर पटेल हा एकच व्यक्ती पंच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी खुलासा करताना फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.
फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेचा मित्र -
फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाचे मित्र आहेत. मी तीन वेगवेगळे पंचनामे सादर केले आहेत. जेथे फ्लेचर पटेल हे पंच आहेत. त्यामुळे एनसीबी अधिकाऱ्याच्या मित्राला पंच बनण्याची परवानगी देता येईल का? याला कायदेशीर परवानगी आहे का?, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
फ्लेचर पटले तीन कारवाईत पंच -
एनसीबीकडून जेव्हा एखादी कारवाई करण्यात येते, या कारवाईनंतर प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून निवडल जाते. हे पंच वादी किंवा प्रतिवादी अशा दोन्ही बाजू पैकी कोणीही नसावेत, असा कायदा आहे. मात्र, फ्लेचर पटेल हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कार्यक्रमांमध्ये समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांसोबत ते दिसतात, असे असताना 25 नोव्हेंबर 2020 ला एमसीबीने केलेल्या कारवाई फ्लेचर पटेल पंच आहेत. त्यानंतर 9 डिसेंबर 2020 या दिवशी केलेल्या केसमध्ये देखील फ्लेचर पटेल पंच आहेत. तसेच 2 जानेवारी 2021 ला करण्यात आलेल्या कारवाईदेखील त्यांचे नाव पंच म्हणून आहेत. एकच व्यक्ती एनसीबीने केलेल्या तीन कारवायांमध्ये पंच कसा काय असू शकतो, या प्रश्नाचे उत्तर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी द्यावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
ती लेडी डॉन कोण? -
फ्लेचर पटेल यांनी आपल्या ट्वीटमधून लेडी डॉनचा उल्लेख केला आहे. ही लेडी डॉन एका राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेशी संलग्न असून तिच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना टार्गेट केले जाते. तसेच त्यांच्यावर दबाव टाकला जातो, असा आरोपही नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.