महाराष्ट्र

maharashtra

Schemes on Balasaheb Name : ठाकरे सरकारने कोणकोणत्या योजनांना दिले बाळासाहेबांचे नाव? वाचा सविस्तर...

गेल्या अडीच वर्षापासून राज्यात कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर ( Aurangabad Sambhajinagar ) करण्याचा घाट घातला आहे. मात्र, तत्पूर्वी या सरकारने बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या नावाने किती योजना सुरू केल्या हे जाणून घेऊया.

By

Published : Jun 29, 2022, 4:12 PM IST

Published : Jun 29, 2022, 4:12 PM IST

thakre name schemes
thakre name schemes

मुंबई -राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi government ) आता अस्थिर झाले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात काही योजना आणि प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकारने सुरू ठेवला आहे. त्यासाठी अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सरकार मंजूर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास औरंगाबादमधील बंडखोर आमदारांना ती मोठी चपराक असणार आहे. बंडखोर आमदारांना धडा शिकवण्या सोबतच मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील जनता शिवसेनेसोबत यानिमित्ताने कायम राहील असा विश्वास महाविकास आघाडी सरकारला विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटतो आहे. म्हणूनच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या योजनांना ठाकरे सरकारने दिले बाळासाहेबांचे नाव? -महाविकास आघाडी सरकारने विशेषता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही योजना आणि प्रकल्पांना आपले पिता तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेल्या योजना आणि प्रकल्प जाणून घेऊया.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प -महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आखण्यात आणि अंमलबजावणी करण्यात येत होता. मात्र हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाला 2020मध्ये सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्याच्या कृषी आणि ग्रामीण उपजीविका क्षेत्रांमध्ये स्मार्ट उपाय योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कृषी व्यवसायांना बळकटी देणे बाजारपेठा उपलब्ध करून देणे शेतकरी संघटित करणे अशा विविध क्षेत्रात हा प्रकल्प काम करतो.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग -मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा महामार्ग समृद्धी महामार्ग या नावाने तत्कालीन शिवसेना भाजपाच्या सरकारने राबवण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रकल्पाचे उर्वरित काम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू राहिले. 46 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प 392 गावांमधून जातो. या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काही कारणास्तव बाळगल्याने आता पुन्हा एकदा या प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस सरकार करणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय - विदर्भातील नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयात इंडियन सफारी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पाला पूर्वी गोंडवाना हे नाव देण्याचा प्रस्ताव होता असे म्हटले जाते मात्र असा कोणताही प्रस्ताव नव्हता त्यामुळे या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नाव देण्यात आल्याची माहिती तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी दिली होती.

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रापंचायत बांधणी योजना -अनेक लहान गावांत आणि ग्रुप ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेत राज्य शासनाने आता राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी याकरीता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला 17 जानेवारी, 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. याबाबत ग्रामसभेने ठरावा करावा. शासनाच्या प्रस्तुत योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय बांधावयाचे झाल्यास त्याचे मूल्य रु.12 लाख इतके निर्धारित करण्यात आले असून, त्यापैकी 90 टक्के प्रमाणे रु.10.80 लाख इतकी रक्कम शासनामार्फत व उर्वरित 10 टक्के प्रमाणे रु.1.20 लाख इतकी रक्कम ग्रामपंचायतीने स्वनिधीतून खर्च करावी.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना -राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल चार वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचे नाव स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना असे ठेवण्यात आले. या योजनेत पहिल्या 72 तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही.

हेही वाचा -Kishori Pednekar Threat To Kill : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details