मुंबई -या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज होणार आहे. याला आंशिक चंद्रग्रहण असे म्हणतात. जे भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दिसणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल 580 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात चंद्रग्रहण दिसणार आहे. तज्ञांच्या मते 1440 मध्ये असे चंद्रग्रहण झाले होते.
पृथ्वीची सावली संपूर्ण चंद्र व्यापू शकते -
या चंद्रग्रहणाचा विचार केला तर हे ग्रहण भारताच्या ईशान्य भागांमध्ये दिसणार आहे. यामध्ये अरुणाचल आणि आसामच्या काही भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. याशिवाय इतर खंडातदेखील हे ग्रहण दिसणार आहे. यामध्ये दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशाचा समावेश आहे. ते ग्रहण सकाळी 11 वाजून 34 वाजता सुरू होणार आहे व संध्याकाळी 5.30 दरम्यान संपणार आहे. खंडग्रास ग्रहणाचा एकूण कालावधी ०३ तास २६ मिनिटांचा असेल. पेनम्ब्रल (उपच्छाया) चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ०५ तास ५९ मिनिटे असणार आहे. सूर्य व चंद्राच्यामध्ये पृथ्वी येते. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. पृथ्वीची सावली संपूर्ण चंद्र व्यापू शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्णपणे गडद होतो. त्यामुळे चंद्र लाल रंगात दिसतो. चंद्रग्रहणाच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातल्या खगोलतज्ज्ञांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.