महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2022, 4:48 PM IST

Updated : Jul 4, 2022, 9:26 PM IST

ETV Bharat / city

CM Shinde In Vidansabha : आम्ही बंडखोर नाही, आता माघार नाही : मुख्यमंत्री शिंदे

आम्ही गद्दार किंवा बंडखोर नाही (We are not rebel) आमचे बाप काढले आम्हाला शीवीगाळ केली मात्र आम्ही एक शब्द काढला नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची 35 वर्षे घालवले आहेत. त्यामुळे आता शहिद झालो तरी चालेल पण माघार नाही ( No turning back now) असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विश्वास दर्शक ठरावा नंतर ते बोलत होते. देशाचे लक्ष लागलेल्या घडामो़डी बाबतही त्यांनी सविस्तर माहिती देत सगळ्यांचा समाचार घेतला.

CM Shinde In Vidansabha
एकनाथ शिंदे

मुंबई:विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक जिंकला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला केवळ ९९ मते पडली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांहून अधिक चाललेल्या सत्तानाट्याचा शेवट सरकार स्थापनेने झाला. या ठरावानंतर मनोगत मांडताना एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य करत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही गद्दार किंवा बंडखोर नाही. आमचे बाप काढले आम्हाला शीवीगाळ केली मात्र आम्ही एक शब्द काढला नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची 35 वर्षे घालवले आहेत. त्यामुळे आता शहिद झालो तरी चालेल पण माघार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण

बाळासाहेबांच्या सैनिकावर विश्वास: भाषनाच्या सुरवातीलाच शिंदे यांनी सोबत आलेल्या 50 आमदारांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, मला वाटले नव्हते, की मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बसू शकेल, या ऐतिहासिक घटनेची नोंद 33 देशांनी घेतली. मंत्री आणि आमदारांनी सत्ता आणि यंत्रणेच्या विरोधात एकत्र आले त्या सगळ्यांनी बाळासाहेबांच्या सैनिकावर विश्वास ठेवला. 50 आमदारांनी मला काहीच न विचारता कोणतेही नियोजन किंवा आमीश दिलेले नसताना मला साथ दिली, अन्यायाविरोधात बंड करायचे हे बाळासाहेबांनी सांगितले होते त्या प्रमाणे मला सगळ्यांनी साथ दिली.

आता माघार नाही:आम्ही तीकडे होतो तेव्हा आमचे बाप काढले, आम्हाले रेडा असे संबोधले महिला आमदारांना वेश्या म्हणले आम्हाला शिवीगाळ करण्यात आली. मात्र आम्ही चकार शब्द ही काढला नाही. मात्र शिवसेनेसाठी मी घर सोडले, घरातील माणसांची भेट होत नव्हती, शिवसेनेसाठी आयुष्याची 35 वर्षे घालवली. मात्र राऊत टीका करताना हे सगळे एका क्षणात विसरले.शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. आमदारांना सांगितले होते, तुम्ही चिंता करू नका. ज्या दिवशी तुमचे नुकसान होईल तेव्हा मला सांगा, तुमचे भविष्य सुरक्षित करेन. एक ग्रामपंचायत सैनिक इकडचा तिकडे जायची हिंमत करत नाही. अशी शिवसेना होती मग हे का झाले, कशासाठी झाले हे पाहायला पाहिजे होते.

ऐतिहासिक नाट्याचे ते दिवस: माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस आमदारांनी केले. मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही, पण आज या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. आज आपण पाहिले तर या महाराष्ट्रात अनेक घटना आपण पाहिल्या. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याची वाटचाल करतात. मधले ऐतिहासिक नाट्य राज्य, देश आणि इतर ३३ देश पाहत होते. एकीकडे बलाढ्य सरकार. यातबसलेली मोठमोठी माणसे होती तर दुसरीकडे, मी मंत्री माझ्यासोबत इतरही मंत्री होते. स्वतःला दावावर लावून 50 आमदार माझ्या सोबत आले. सत्ता, यंत्रणा एकीकडे तर दुसरीकडे एक कार्यकर्ता सैनिक. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या पन्नास लोकांचा. यापैकी एकानेही विचारले नाही कुठे चाललोय, कशासाठी चाललोय.

अदल्यादिवशी मी डिस्टर्ब होतो:ज्या दिवशी मी निघालो त्याच्या अदल्यादिवशी मी डिस्टर्ब होतो. मतदान होते त्या दिवशी मला जी काही वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार आमदार आहेत. मला काय झाले माहिती नाही. बाळासाहेबांनी नेहमी सांगितले होते, अन्याय मागण्यासाठी बंड असे उठाव केले पाहिजेत. माझे फोन सुरू झाले. लोक येऊ लागले. मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन केला. मी काही लपवू इच्छित नाही. मला कोणीही कुठे चालला कधी येणार काहीही विचारले नाही. यापैकी एकाही आमदारांनी मला मुख्यमंत्री महोदयांना भेटू नये असे म्हटले नाही. हा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. यामध्ये सुनील प्रभूंना पण माहिती आहे. आमचे कसे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला.

घरावर दगड मारणारा पैदा व्हायचाय : एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारणारा पैदा झालेला नाही. मधमशासारखे मोहोळ उठते. 20-25 वर्षे या एकनाथ शिंदेने जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी केले. 17 वर्षांचा असताना बाळासाहेबांच्या विचाराने वेडे केले. धर्मवीर आनंद दिघेंची भेट झाली. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी मी शाखाप्रमुख झालो. मी दिघे साहेबांना सांगितले. त्यांनी खांद्यावर हात टाकला. मी त्यांना सांगितले. सीनियर लोकांना पद द्या. त्यांची एक भाषा होती. मला शिवी घातली. मला शिकवतो का आणि मला शाखाप्रमुख बनवले. 1997 मी नगरसेवक झालो. त्यानंतर काम केले कधीही मागे वळून पाहिले नाही. कुटुंब, घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो.

मी शिवसेनेला कुटुंब मानले: आमचे बाप काढले, कोणी रेडा म्हणाले, कोणी प्रेत म्हणले. महिला आमदारांना तर वेश्या म्हणायचे. कुठल्या थराला गेले. मी शांत असायचो. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळी मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. मी आपल्याला सांगतो दादा, बाप काढले. माझे वडील जिवंत आहेत. मला एकदा उद्धव साहेबांनी फोन केला होता. मी आईला सांगितले माझी आई साधीय तेव्हा आई बोलली होती माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळचय. माझे वडील कष्ट करून पुढे आले. मी घरी जायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे. पंधरा पंधरा दिवसांनी भेट व्हायची. हेच श्रीकांत सोबत झाले. त्याला बाप म्हणून कधी वेळ देऊ शकलो नाही. कारण मी शिवसेनेला कुटुंब मानले.

बाळासाहेब, दिघे साहेब माझे दैवत :माझी तेव्हाची परिस्थिती कशासाठी जगायचे अशी झाली होती. माझे आता काही राहिले नाही असे वाटायचे. आनंद दिघे माझ्याकडे एकदा-दोनदा नव्हे पाचवेळा आले. त्यांनी मला धीर दिला, त्यांनी मला एकदा रात्री बोलावले. एकनाथ तू नाही म्हणू नकोस. तुला इतरांच्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील असे बजावले. त्याच वेळी त्यांनी मला दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रु येऊ नयेत यासाठी पण प्रयत्न करावा लागेल हे पण सांगितले. बाळासाहेब तसेच दिघे साहेब हेच माझे दैवत होते. त्यांनीच मला सभागृह नेता बनवले. असे सांगताना शिंदे यांना अश्रु अनावर झाले होते.

एकनाथला काही झाले तर... :जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे. एकनाथ शिंदे वेड्यासारखा काम करायचा. कारण माझ्या पाठिशी दिघे साहेब होते काही भीती नव्हती. त्यावेळी लेडीज बारचा सुळसुळाट होता. मी एकट्याने सोळा लेडीज बार बंद केले. माझ्यावर शंभर पेक्षा जास्त केस आहेत. हायकोर्टात माझ्याविरोधात पिटीशन दाखल झाली. त्यावेळी मुंबईत गँगवॉर सुरू होते. त्यावेळी मला ठार करायचा प्लॅन होता. त्यावेळी दिघे साहेबांनी काही अधिकाऱ्यांना बोलावले. एकनाथला काही झाले तर. काही खैर नाही. असे सांगितले, मी आंदोलन केली. शिवसेना वाढवली. माझ्यासोबत जिवाला जीव देणारे कार्यकर्ते होते. ते कशाचीही पर्वा करायचे नाहीत. असे करताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळी मी साफ कोलमडून गेलो होतो.

माझ्या विभागात सगळ्यांचा हस्तक्षेप: अडीच वर्षांत आम्हाला जे अनुभव आले त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. अडीच वर्षांत आम्हाला एकदाही सावरकरांबाबत बोलता आले नाही. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला तेव्हाही काँग्रेसचा विरोधात भूमिका घेता आली नाही, कारण आम्ही सत्तेत एकत्र होतो. साचलेल्या गोष्टींमुळे हे सगळे आमदार एकत्र आले आणि त्यांनी अन्यायाविरोधात बंड करत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आहे, माझ्यासह 50 आमदारांचा मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र आलो आहोत. माझ्या विभागात सगळेच जण हस्तक्षेप करत होते, म्हणून मला अजित पवारांनी हस्तक्षेप केल्याचे वाईट वाटले नाही.

हेही वाचा : CM Eknath Shinde Emotional : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भावूक

Last Updated : Jul 4, 2022, 9:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details