मुंबई - राज्यातील 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. आज सरासरी 76 टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के, तसेच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज मतदान झाले. तर या सर्व जागांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे.
राज्यात कुठे किती मतदान? -
- नंदुरबार :धडगाव नगरपंचायत निवडणुकीत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत एकूण 79.83 टक्के मतदान झाले. तर या निवडणुकीत एकूण 3811 पुरुष, तर 3712 महिलांनी मतदारांनी मतदान केले. तर एकूण 7523 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
- चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सावली 78 टक्के, पोंभुरणा 80.19 टक्के, गोंडपिपरी, 78.13 टक्के, कोरपना 87.81 टक्के, जिवती 75.06 टक्के, सिंदेवाही 76.00 टक्के, नागभीड 51 टक्के मतदरांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. तर एकूण सरासरी मतदान 75.17 टक्के झाले.
- गडचिरोली :गडचिरोलीतील 9 नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. गडचिरोलीत दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 75.41 % मतदान झाले होते.
- जालना : जालन्यातही आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 61.06 टक्के मतदान पार पडले. यामध्ये घनसावंगी नगर पंचायत 76.78 टक्के मतदान, बदनापूर नगर पंचायत 67.29 टक्के, तिर्थपुरी नगर पंचायत 72.52 टक्के, मठा नगर पंचायत 67.84 टक्के, तर जाफ्राबाद नगर पंचायत 66.15 टक्के मतदान पार पडले.
- पुणे : देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 74.97% मतदान पार पडले. यामध्ये 5649 पुरुष, तर 5168 महिला मतदारांनी मदतानाचा अधिकार बजावला.
- जळगाव :बोदवड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत एकूण टक्केवारी 72.50% मतदान झाले. यामध्ये 5975 पुरुष, तर 5238 महिला मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- हिंगोली :औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये एकूण 9517 पैकी 7878 मतदारांनी म्हणजेच 79. 63 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सेनगाव नगरपंचायत निवडणुकीत एकूण 5026 पैकी 4356 म्हणजे 86.67 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- अमरावती :अमरावतीत तिवसा नगरपंचायत साठी ७०.७० टक्के तर भातकुली साठी ८१.६१ टक्के मतदान झाले.
बीड वगळता सर्वत्र शांततेत निवडणूक -