मुंबई : विधानसभा अंधेरी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला (Vidhan Sabha Andheri by election program announced) आहे. १४ ॲाक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. १७ ॲाक्टोबरला अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारिख आहे. ३ तारखेला मतदान होईल. तर ६ नोहेंबरला निकाल लागेल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीत पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार सामना रंगणार आहे. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक (Vidhan Sabha election) होत आहे.
शिवसेना विरोधात भाजप थेट लढत -आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. शिवसेनेचा हा मतदार संघ आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याचे शक्यता असताना भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली (Vidhan Sabha Andheri election)आहे.