मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज 60 हजार 153 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 25 लाख 80 हजार 787 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज गुरूवारी 60 हजार 153 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 हजार 070 लाभार्थ्यांना पहिला तर 41 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 25 लाख 80 हजार 787 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 99 हजार 704 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 81 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 87 हजार 990 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 36 हजार 243 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 39 हजार 607 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 03 हजार 644 तर 18 ते 44 वर्षामधील 13 हजार 303 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम -