महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत तब्बल 14 वेळा बदल्या

जिथे बदली होईल तिथे गेल्यानंतर मुंढे हे कायमच शिस्तीसाठी कठोर भूमिका घेत असे, तसेच कामांबाबतीतले ताबडतोब निर्णय घेण्यात ते माहीर आहेत. ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्याठिकाणी सत्ताधाऱयांसोबत त्यांचे खटके उडत असे. त्यामुळे मुंढे हे कुठेच जास्त काळ टिकले नाहीत. त्यांच्या कायमच बदल्या होत राहिल्या आहेत. पण, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय आहेत.

Tukaram mundhe
तुकाराम मुंढे

By

Published : Aug 26, 2020, 7:22 PM IST

Updated : Aug 26, 2020, 8:04 PM IST

मुंबई - नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये मुंढे यांची बदली झाली आहे. धडाकेबाज व शिस्तप्रिय असलेले तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत तब्बल 14 वेळा बदल्या झाल्या आहेत. जिथे बदली होईल तिथे गेल्यानंतर मुंढे हे कायमच शिस्तीसाठी कठोर भूमिका घेत असे, तसेच कामांबाबतीतले ताबडतोब निर्णय घेण्यात ते माहीर आहेत. त्यामुळे धडाकेबाज कार्यशैलीमुळेच मुंढे हे कुठेच जास्ती काळ टिकले नाहीत. त्यांच्या कायमच बदल्या होत राहिल्या आहेत. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय आहेत.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात झाला असून मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंढे यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्व प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले. २००५ मध्ये ते युपीएससी परीक्षेत पास झाले आणि आयएएस अधिकारी बनले. विशेष म्हणजे ते देशात 20 वे आले होते.

तुकाराम मुंढे यांच्या बदल्या

सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)

नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009)


नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)

वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010)


मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011)


जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)


मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)


सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)


नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)


पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)


नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)

राज्य नियंत्रण एड्स सोसायटी, मुंबई (२०१८)

नागपूर मनपा आयुक्त (२०१९)

अखेर आता पुन्हा एकदा त्यांची मुंबई येथील जीवन प्राधिकरण येथे बदली (२०२०)

Last Updated : Aug 26, 2020, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details