मुंबई -महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी 27 मे रोजी ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान ईडीने अनेक कागदपत्रे जप्त केले होते. त्या अनुषंगाने काल ईडीने अनिल परब ( Sanjay Kadam interogation by ED ) यांचे निकटवर्तीय संजय कदम यांची ईडी कार्यालयात 7 तास चौकशी केल्यानंतर ( Sanjay Kadam ED news ) त्यांना सोडले.
हेही वाचा -Rajya Sabha candidate assets : राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रफुल्ल पटेल, पीयूष गोयल 'इतक्या' कोटींचे मालक
संजय कदम यांची ईडीने चौकशी केली आहे. दापोलीतील साई रिसोर्ट प्रकरणात चौकशी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता या प्रकरणात अनिल परब यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून, ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरीत अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. अनिल परब यांच्या मुंबईतील शासकीय बंगला येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. विशेष म्हणजे, अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीचा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती त्या अधिकाऱ्याने अनिल परब यांची चौकशी केली होती.
अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक संजय कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. याअगोदरही अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी कदम यांच्या घरी त्यांना मोठा मुद्देमाल हाती लागला होता. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.
किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचे नाव समोर आले होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठे घबाड हाती लागले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
हेही वाचा -Mumbai Municipal Corporations School : मुंबई महापालिकेच्या शाळांना अच्छे दिन: ३५ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश