महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shelter House In Mumbai : त्यांच्यातही माणुसकी आहे! तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर

ट्रांसजेंडर ज्यांना बघून तुम्ही नाकमुरडता ज्यांना तुम्ही छक्का हिजडा अशा विविध नावाने ओळखता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का ? बदलत्या काळासोबत आज ही लोकं सुद्धा बदलत आहेत. ( Transgender run Shelter House ) वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये हे बांधव काम करत आहेत. यांच्यासाठी एक संस्था काम करते त्या संस्थेचे नाव आहे ट्विट फाउंडेशन. पाहूयात ईटीव्ही भारतने घेतलेला याबाबतचा खार रिपोर्ट-

तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर
तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर

By

Published : Apr 18, 2022, 12:41 PM IST

मुंबई - ट्रांसजेंडर ज्यांना बघून तुम्ही नाकमुरडता ज्यांना तुम्ही छक्का हिजडा अशा विविध नावाने ओळखता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का ? बदलत्या काळासोबत आज ही लोकं सुद्धा बदलत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये हे बांधव काम करत आहेत. यांच्यासाठी एक संस्था काम करते त्या संस्थेचे नाव आहे ट्विट फाउंडेशन. पाहूयात ईटीव्ही भारतने घेतलेला याबाबतचा खार रिपोर्ट-

तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर

ट्विट फाउंडेशन नेमकं काय आहे ? - फिट फाऊंडेशन ही संस्था सात तृतीयपंथीयांनी एकत्र येत तृतीयपंथीयांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी सुरू केलेली एक संस्था आहे. ( Transgender run Shelter House In Mumbai ) या संस्थेच्या गरिमा गृह या प्रकल्पाअंतर्गत मागच्या एक वर्षापासून इथं शेल्टर होम चालवले जात. आहे. या शेल्टर होममध्ये ज्या तृतीयपंथीयांना घरच्यांनी नाकारले, ज्यांना स्वतःची काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायची आहे, त्यांना मदतीचा हात म्हणून इथं आसरा दिला जातो. त्यासोबतच येथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांना त्यांचे स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण दिले जाते सोबतच त्यांचं काउन्सिलिंग देखील केले जातं.

तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर

ट्रान्स मेल, ट्रान्स फिमेल दोन प्रकारचे तृतीयपंथी -या शेल्टर होम मध्ये ट्रान्स मेल आणि ट्रान्स फीमेल अशा दोन प्रकारचे तृतीयपंथी राहतात. या तृतीयपंथी समाजातील या दोन प्रकारांबद्दल रुद्र सांगतात की, "ट्रान्स मेल म्हणजे जन्मतः मुलगी आहे पण तिला आतून आपण मुलगा आहोत असं वाटतं. अशा तृतीयपंथींना त्रांस मेन असं म्हणतात. तर जे जन्मतः पुरुष असतात पण त्यांना आपण एक स्त्री आहोत असं वाटत असतं त्यांना ट्रान्स वुमेन असं म्हणतात."

'खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो' -गायु करोटे सांगतात की, "मी एक ट्रान्स वुमेन आहे. म्हणजे मी जन्मताच एक पुरुष असून हळूहळू माझ्यात स्त्रीचे गुणधर्म डेव्हलप होत आहेत. मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा मला याचा खूप मानसिक त्रास सहन करावा लागत होता. कारण माझ्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये हळूहळू फरक पडत होता. मी जेव्हा बाथरूमला जायचे तेव्हा माझे मित्र माझ्या मागेमागे यायचे कधीकधी माझ्या लिंगाला हात लावायचे, मला खूप चिडवलं जायचं याचा मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला."

तृतीयपंथी चालवतायेत तृतीयपंथीयांसाठी निवारा घर

घरी अंधश्रद्धा -गायु पुढे सांगतात की, "मी एका सामान्य कुटुंबातून आले. घरचे फारसे शिकलेले नाहीत. त्यामुळे माझ्यात होणारे बदल पाहून त्यांना असं वाटत होतं माझ्यात एखाद्या मुलीचा आत्मा शिरलाय की काय ? त्यासाठी त्यांनी मला मांत्रिकाकडे देखील नेलं. मांत्रिकाने घरच्यांना वेडं बनवून चांगलेच पैसे लुटले पण माझ्या घरच्यांना हेच वाटत होतं. त्यावेळी मला देखील पैशाची गरज होती कारण मला पुढे शिकायचं होतं पण घरच्यांनी मला पैसे न देता मांत्रिकाला पैसे दिले."

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारचं सहकार्य -या शेल्टर होमला भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाची मान्यता मिळाली असून तृतीयपंथी समाजाच्या सुधारणेसाठी त्यांना समाजात न्याय मिळावा त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी या संस्थेला मदत केली जाते. त्यांना मार्गदर्शन केले जाते. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी इथे मोफत राहण्याची व खाण्याची जेवणाची सोय केली जाते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीदेखील मार्गदर्शन केले जाते.

पोलिसांचं सहकार्य आवश्यक -इथल्या प्रोजेक्ट मॅनेजर मेघना सांगतात की, "मी स्वतः एक ट्रान्स वुमेन आहे. यातील अनेकांना घरच्यांचं सहकार्य नाही. घरचे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतात आणि पोलिस आम्हाला त्रास देतात. इथली मुलं पोलिसांना सांगतात आम्ही 18 वर्षे पूर्ण केलेली आहेत, आम्ही काय करतोय आम्हाला कळतंय, आम्ही स्वतःच्या मर्जीने येथे आलेलो आहोत, आम्हाला घरी जायचं नाही, इतकं सांगून देखील पोलीस आमचं ऐकत नाहीत. पोलीस इथल्या अनेकांना सांगतात तुम्ही इथे राहू नका ही एक विकृती आहे. ते तुम्हाला विकुन टाकतील. पोलिसांनी अशी भूमिका न घेता आम्हाला समजून घ्यावं, आम्हाला सहकार्य करावं." अशी आशा मेघना यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -World Heritage Day 2022 : आज जागतिक वारसा दिन; वाचा काय आहे यावर्षीची थीम

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details