महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

आज पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुंबई सेंट्रल दिशेकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

By

Published : May 25, 2019, 12:52 PM IST

मुंबई पश्चिम लोकल

मुंबई -आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी हा मेगा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुंबई सेंट्रल दिशेकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवार 25 मे ला रात्री 11 वाजून 55 मिनिटे ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत माटुंगा ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत सर्व अप मार्गावरील जलद लोकल सांताक्रूझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक
कुठे- माटुंगा ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक
कधी - २५ मे रा. ११.५५ ते प.३.५५

ABOUT THE AUTHOR

...view details