महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2022, 1:55 AM IST

ETV Bharat / city

Firefighters injured : अग्निशमन दलाकडून मॉकड्रील सुरू असतानाच तीन जवान जखमी

माटुंगा येथे अग्निशमन दलाकडून मॉकड्रील सुरू असतानाच डोन वाहनांमध्ये अडकून तीन जवान जखमी झाले. तिघांनाही सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Firefighters injured) दरम्यान, हा अपघात चुकीच्या पद्धतीची वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात घेतल्याने झाला आहे. यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

अग्निशमन दल
अग्निशमन दल

मुंबई - मुंबईत नेहमीच आगीच्या घटना घडतात. आगीच्या घटनांमधून नागरिकांनी आपला बचाव कसा करावा यासाठी अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण दिले जाते. (Firefighters injured) तसेच, मॉकड्रिल केले जाते. माटुंगा येथे अग्निशमन दलाकडून मॉकड्रील सुरू असतानाच डोन वाहनांमध्ये अडकून तीन जवान जखमी झाले. तिघांनाही सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात चुकीच्या पद्धतीची वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात घेतल्याने झाला आहे. (Three jawans were injured) यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

प्रतिक्रिया

तीन जवान जखमी -

मिळालेल्या माहितीनुसार माटुंगा पूर्वेला भाऊ दाजी रोडजवळ श्री सिद्धी बिल्डिंगमध्ये मॉकड्रिल घेण्यात आली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी सराव करत होते. (Firefighters injured In Mumbai) तसेच, इमारतीला आग लागल्यावर अग्निशमन उपकरणे कशी हाताळावीत याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात होते. मॉकड्रिल करताना पाण्याचा दाब वाढल्याने अग्निशमन दलाचे वाहन पुढे सरकले आणि त्यात तीन जवान जखमी झाले.

पाणीपुरवठ्याचा दाब वाढला -

मुंबईचे मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी हेमंत परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठ्याचा दाब वाढला, त्यामुळे वाहन अचानक पुढे सरकले त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या इतर वाहनांच्या तीन चालकांना वाहनाने धडक दिली. त्यात चालक सदाशिव धोंडिबा कर्वे (५३) हे गंभीर जखमी झाले असून ते सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत. चंचल भीमराव पगारे आणि निवृत्ती सखाराम इंगवले अशी अन्य दोन जखमींची नावे आहेत, अशी माहिती रुग्णालयातून देण्यात आली.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी -

MAN या जर्मन कंपनीच्या ओरिजनल गिअर बॉक्स असणारऱ्या गाड्यांना Allison या अमेरिकन कंपनीचे ॲाटोमेटीक गिअर बॉक्स बसवून सदर गाड्या अग्निशमन दलामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आग विझवण्याचे कार्य चालू असताना पाण्याचा पंप चालवताना एका मर्यादेपेक्षा जास्त इंजिनचा वेग वाढवल्यास गिअर बॉक्स ड्राइविंग मोडमध्ये जातो व यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे जायला लागते. अग्निशमन दलाच्या ताफ्यात अशी वाहने घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अग्निशमन बहुजन कर्मचारी अधिकारी संघाचे सरचिटणीस संजय कांबळे बापरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा -बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्यपालांना भेटणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details