महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police Threatened सुरक्षा यंत्रणा सज्ज, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन

धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले Mumbai Police High Alert आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन Mumbai Police Threatened केले.

Mumbai CP Vivek Phansalkar
मुंबईचे सीपी विवेक फणसळकर

By

Published : Aug 20, 2022, 4:25 PM IST

मुंबई26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना Mumbai Police आला होता. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले Mumbai Police High Alert आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन Mumbai Police Threatened केले.

ते म्हणाले की, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. मुंबई गुन्हे शाखा याबाबात सखोल कारवाई करत आहे. तसेच यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री मुंबईच्या ट्रॅफिक पोलीस कंट्रोलला एक मेसेज आला होता, त्यात दहशत पसरवण्याबाबत बोलत होते, ते धमक्या देत होते. धमकी देणाऱ्यांचे काही साथीदार भारतातही सक्रिय असल्याचा उल्लेख मजकूरात आहे, अशी माहिती मुंबईचे सीपी विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar on Threat Message यांनी दिली.

सागर कवच ऑपरेशन सुरूमुंबई पोलीस हे प्रकरण हलक्यात घेणार नाहीत, आम्ही या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहोत. आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही. आम्ही सागर कवच ऑपरेशन सुरू केले आहे आणि सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांना सतर्क केले आहे, अशी माहिती मुंबईचे सीपी विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details