मुंबई- 'मेट्रो कारशेड हटवा, आरे वाचवा', या मागणीसाठी आरे कॉलनीमध्ये रोज हजारो लोक मानवी साखळी उभी करून या वृक्षतोडीला विरोध करत आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मुंबई छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनीही मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला.
'आरे वाचवा'साठी आता विद्यार्थी संघटनेचाही मानवी साखळीत सहभाग
सरकारने आरेच्या जंगलातील अडीच हजार झाडे तोडून मेट्रो कारशेड उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला सामान्य लोकांपासून ते राजकीय व सेलेब्रिटी मंडळींनीकडून विरोध होत असताना आता विद्यार्थी संघटनांनीही पुढाकार घेत निदर्शने केली.
आरे वाचवासाठी छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांची निदर्शने