महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे लाईन लगतच्या झोपड्यांचे राज्य सरकारने पुनर्वसन करावे - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

राज्यातील महा विकास आघाडीच्या नेत्यांना अर्थसंकल्प कळत नाही, असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाला अकराशे कोटी रुपये मिळायचे. मात्र, आताच्या अर्थसंकल्पात अकरा हजार कोटी रुपये मिळाल्याचा दावाही दानवे ( Raosaheb Danve on slum rehabilitate ) यांनी केला.

Union Minister of State for Railways Raosaheb Danve
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

By

Published : Feb 16, 2022, 5:33 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:12 PM IST

मुंबई -मुंबईतील उपनगरीय रेल्वे लाईन्स शेजारी अनेक झोपडपट्ट्या वसल्या आहेत. विशेषत: हार्बर मार्गावरील रेल्वे लाईन शेजारी अनेक झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.रेल्वेच्या हद्दीत असलेल्या या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रेल्वे मंत्रालयाने करावे, असे राज्य सरकारचे मत आहे.मात्र, रेल्वे लाईन लगत असलेल्या त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve on slum rehabilitate ) यांनी मुंबईत केला.

माहिती देताना कंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

हेही वाचा -BMC Election 2022 : प्रभाग पुनररचना नागरिक व लोकप्रतिनिधींसाठी त्रासदायक - भाजपाची तक्रार

महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजेट कळत नाही- दानवे

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्थसंकल्प कळत नाही, असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाला अकराशे कोटी रुपये मिळायचे. मात्र, आताच्या अर्थसंकल्पात अकरा हजार कोटी रुपये मिळाल्याचा दावाही दानवे यांनी केला. दरम्यान, या कालावधीत रेल्वेच्या ज्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या त्या लवकरच पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही दानवेंनी सांगितले.

संजय राऊत यांना एकटेपणाची भीती - दानवे

संजय राऊत यांना कारवाईची भीती वाटत असावी. एकट्यावर कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी सर्व नेत्यांना आपल्यासोबत घेतले असावे, असा टोला दानवेंनी लगावला. दरम्यान राऊत यांनी वापरलेले अपशब्द हीच त्यांची संस्कृती आहे. राऊत यांना अपशब्द शोभत नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -Mumbai : ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात 8 दिवसांत सरकारी वकिलाची नियुक्ती करा; सत्र न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Last Updated : Feb 16, 2022, 8:12 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details