महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्वाची माहिती पोहचवत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas  atavle
Ramdas atavle

By

Published : May 8, 2021, 2:19 AM IST

मुंबई - कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्वाची माहिती पोहचवत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना रेल्वे प्रवास करता येत नाही -

पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकारचे पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्येही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकारने केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्सचा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही. ही खेदजनक बाब आहे असल्याचे आठवले यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र -

पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्यांचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या या बिकट काळात 124 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांचा मदत निधी द्यावा. अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details