महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धार्मिक कारणाने पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नकार, विकासक काळ्या यादीत - स्थायी समितीचे निर्देश

चेंबूर नाका येथील भाऊराव हरिश्चंद्र चेंबुरकर या मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र विकासकाने आपण जैन धर्मीय असल्याच्या कारणाने या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला नकार दिल्याने अशा विकासकाला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश स्थायी समितीने दिले आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष

By

Published : Sep 10, 2019, 8:04 AM IST

Updated : Sep 10, 2019, 10:34 AM IST

मुंबई- चेंबूर नाका येथील भाऊराव हरिश्चंद्र चेंबुरकर या मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात विस्थापित होणाऱ्या पात्र गाळेधारकांसाठी त्याच भूखंडावरील बाजूच्या मोकळ्या जागेवर संक्रमण शिबिरे बांधली जाणार आहेत. तसेच मासळी, मटण विक्रेत्यांसाठी शेडचे बांधकामही केले जाणार आहे. मात्र विकासकाने आपण जैन धर्मीय असल्याच्या कारणाने या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे धर्माचा उल्लेख करून प्रस्तावाला नकार दिल्याने, अशा विकासकाला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्थायी समितीत दिले.

विकासकाला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश

हेही वाचा - मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत निर्णयांचा धडाका.. 41 हून अधिक विषयांना मंजुरी

चेंबुरकर मंडई सी- १ कॅटेगिरीतील आहे. चेंबुरकर मंडई पाडून त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. मंडईतील परवानाधारक विस्थापित गाळेधारकांना त्याच भूखंडावर संक्रमण शिबिर बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार संक्रमण शिबिराचे आराखडाचा प्रस्ताव महापालिकाचे वास्तुशास्त्रत्र यांनी इमारत विभागाकडून मंजूर करून घेतले आहेत. या प्रस्तावात संक्रमण शिबिरासह मासळी, मटण विक्रेता यांच्याकरीता पत्र्यासह लोखंडी शेडचे बांधकाम करणे, दोन आसनी शौचालये, पाण्याच्या टाकी, पंप हाऊस बांधण्याचे नमूद आहे. यासाठी ८८ लाख १ हजार ७४२ इतके रुपये खर्च केला जाणार आहे.

मात्र संबंधित विकासकाने जैन धर्मीय असल्याने सदर काम करण्याकरता नकार दिला. विकासकाने तशी सुचनाही प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे नियमानुसार संबंधित कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. तसेच हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जैन असल्याने हे काम करण्यास उल्लेख करून प्रस्तावास नकार देणाऱ्या संबंधित विकासकाला काळ्या यादीत टाकावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

Last Updated : Sep 10, 2019, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details