मुंबई- रेल्वे पोलिसांकडून एका 21 वर्षीय युवकाचा शोध घेतला जात असून, सोशल माध्यमांवर या युवकाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे. अंगावर काटा आणणार्या व्हिडिओमध्ये युवक रेल्वे रुळावर बसलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक पिस्तूल असून तो कपाळावर लावून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतानाचे दृश्य व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या युवकाच्या मागून लोकल रेल्वे जात असल्याचेही पाहायला मिळत आहे.
सोशल माध्यमांवर पोस्ट केला व्हिडीओ