महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 1, 2021, 1:42 PM IST

ETV Bharat / city

लोकल, हॉटेल सुरू झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा दैनंदिन ३०० रुपयांचा भत्ता बंद

मार्गदर्शक तत्वानुसार ५ ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टोरंट सुरू झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा जेवण आणि खाण्याचा प्रश्न निकाली निघत असल्याने ३१ डिसेंबर पासून दैनंदिन ३०० रुपये भत्ता रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले आहे.

BMC
मुंबई महापालिका

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद होती. हॉटेल बंद होती. अशा स्थिती पालिका कर्मचारी मुंबईबाहेरून कामावर येऊन कोरोनाचा मुकाबला करत होते. यासाठी कर्मचाऱ्यांना दैनंदिन ३०० रुपये भत्ता दिला जात होता. आता अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मुंबईत रेल्वे सेवा सुरू झाली आहे. हॉटेलही सुरु झाले आहेत. यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा दैनंदिन ३०० रुपये भत्ता बंद करण्यात येत असल्याचे पत्रक पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

महापालिका परिपत्रक

कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊन
मुंबईत मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळून आला. बघता बघता कोरोनाचा प्रसार मुंबईभर झाला. केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊन घोषित झाल्याने ट्रेन बंद करण्यात आल्या. नागरिकांना अत्यावश्यक काम असले तरच घरातून पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असे आवाहन पालिका आणि सरकारकडून करण्यात आले. याच दरम्यान ट्रेन व हॉटेल बंद असल्याने मुंबई बाहेरून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होऊ लागले होते.

ट्रेन, हॉटेल सुरू, भत्ता बंद
कर्मचाऱ्यांचे प्रवासाचे आणि जेवणाचे हाल होत असल्याने पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना २३ मार्च पासून कामाच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी तसेच जेवणासाठी प्रत्येकी दैनंदिन ३०० रुपये भत्ता देण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्याप्रमाणे हा भत्ता गेले ९ महिने दिला जात होता. आता मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जून पासून लोकल ट्रेन सुरू झाल्याने तिन्ही मार्गावर फास्ट आणि स्लो लोकल सेवा सुरू आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरील प्रवाशांना बेस्ट आणि एसटीच्या बसेस सुरू आहेत. तसेच मार्गदर्शक तत्वानुसार ५ ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टोरंट सुरू झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा जेवण आणि खाण्याचा प्रश्न निकाली निघत असल्याने ३१ डिसेंबर पासून दैनंदिन ३०० रुपये भत्ता रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले आहे.

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी १६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी

मुंबई पालिकेच्या आकस्मिक निधीतून कोरोनाच्या उपाययोजनांसाठी अतिरिक्त ४०० कोटी रुपयांसह १६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ८५० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. ४५० कोटी नुकतेच खर्च करण्यात आले आहेत. तर येत्या काळात कोरोनाचा प्रसार रोखणे, लसीकरण, औषधे, कर्मचाऱ्यांचा खर्च आदीवर आणखी ४०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

हीही वाचा- आता थेट रश्मी ठाकरे यांनाच पत्र लिहितो... हिच का तुमची भाषा?

ABOUT THE AUTHOR

...view details