महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालमत्ता कर वसुलीसाठी जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा पालिका करणार लिलाव

मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली जाणार असून त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हेलिकॉप्टरचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Property Tax Recovery Helicopter Auction Mumbai
मालमत्ता कर वसुली हेलिकॉप्टरच लिलाव मुंबई

By

Published : Sep 26, 2021, 10:45 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली जाणार असून त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हेलिकॉप्टरचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून हेलिकॉप्टरचा लिलाव होणे ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा -राज्यात रुग्णसंख्या स्थिर; 3 हजार 206 नवे कोरोना रुग्ण आढळले, 36 रुग्णांचा मृत्यू

हेलिकॉप्टरचा लिलाव

मेस्टो एअर स्पेस कंपनीचा मार्च २०२० मध्ये १ कोटी ९४ लाख ८७ हजार रुपये इतका मालमत्ता कर थकलेला होता. ही थकबाकी वसुलीसाठी कंपनीची जल व वीज जोडणी यापूर्वी खंडित केली होती. त्यानंतरही हा कर भरला नसल्याने थकीत कर भरण्यासाठी सातत्याने कंंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त केले होते. तरीही थकीत कर भरण्यास टाळाटाळ केल्यान जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा लिलाव करून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका हेलिकॉप्टरच्या लिलावाची रक्कम व लिलाव करण्याबाबत सूचना करण्यासाठी एका तज्ञ समितीची नियुक्ती करणार आहे. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार हेलिकॉप्टरचा लिलाव केला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

प्रॉपर्टी जप्त होणार

मालमत्ता कर जे कोणी भरत नाहीत अशा लोकांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. अनेक जण कर भरत नाहीत. कर भरला नाही तर त्याची प्रॉपर्टी सील करण्याचा अधिकार पालिकेला आहे. करदात्यांनी कर वेळेवर भरावा नाहीतर त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार आहे. ज्यांनी मालमत्ता कर भरला नसेल तर त्यांनी तो त्वरित भरावा. पालिकेचा मालमत्ता कर हा उत्पनाचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे, आता वेगाने कारवाई करणार आहोत. गरीब, मध्यमवर्गीय लोक मालमत्ता कर भरतात, मात्र धनदांडगे कर भरत नाहीत, असे महापौरांनी सांगितले.

खड्ड्यांचा आढावा घेणार

मी उद्या मुंबईतील खड्ड्यांचा आढावा घेणार आहे. अधिकारी खड्डे बुजवण्याची कामे का करत नाही? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. अधिकारी असे वागत असतील तर, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक आरोप करत आहेत, ते त्यांचे काम करत आहेत, मात्र त्यांनी फक्त खोटे आरोप करू नयेत, ठेकेदार निकृष्ट काम करत असतील तर योग्य कारवाई केली जाईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

हेही वाचा -मुंबई पालिका निवडणूक, काँग्रेस लढणार 227 जागा

ABOUT THE AUTHOR

...view details